दिग्गज अभिनेते सुपरस्टार रजनीकांत यांनी आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबई येथील निवासस्थानी जाऊन ठाकरे कुटुंबियांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीची राजकीय पासून सिनेवर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, ही कोणतीही राजकीय भेट नसून केवळ सदिच्छा भेट असल्याचे सांगितले जात आहे. याआधीदेखील रजनीकांत मुंबई दौऱ्यावर आलेले असताना ते शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना भेटले आहेत. (Superstar Rajinikanth makes another appearance on Matoshree)
याप्रसंगी आदित्य ठाकरे यांनी सोशल मिडियावर फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे. दरम्यान, श्री रजनीकांत जी पुन्हा एकदा मातोश्रीवर आल्याने खूप आनंद झाला, अशा आशयाचे ट्विट करत आदित्य ठाकरे यांनी वृत्ताला दुजोरा दिला.
An absolute delight to have Shri Rajnikant ji at Matoshri once again. pic.twitter.com/94MV7m0Rb9
— Aaditya Thackeray (@AUThackeray) March 18, 2023
ऑक्टोबर 2010 मध्ये रजनीकांत यांनी मातोश्री येथे बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती. दरम्यान जुलै 2021 मध्ये रजनीकांत यांनी त्यांच्या राजकीय प्रवेशासाठी सुरू केलेले रजनी मक्कल मंद्रम बरखास्त करणार असल्याची घोषणा केली होती आणि भविष्यात राजकारणात स्वत:ला सामील करण्याचा त्यांचा कोणताही हेतू नसल्याचा पुनरुच्चार केला होता.

बाळासाहेब हे चित्रपटशौकीन आणि कलाकारांचे स्नेही होते, त्यामुळेच दिग्गज कलाकारही बाळासाहेबांना भेटायला मातोश्रीवर जात होते. यापूर्वीही रजनीकांत यांनी बाळासाहेबांना भेटून त्यांच्याबद्दलचं प्रेम व्यक्त केलं होतं. सन २०१० मध्ये रजनीकांत यांचा ‘रोबोट’ म्हणजेच तामीळ भाषेतला ‘एंद्रीयन’ हा चित्रपट आला होता. या चित्रपटाच्या निमित्तानं रजनीकांत मुंबईत आले होते. त्या वेळी त्यांनी बाळासाहेबांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार, दुपारच्या वेळेत भेटून त्यांनी बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच, तामिळचं राजकारण आणि सिनेसृष्टीबद्दलही मनमोकळेपणाने गप्पा मारल्या होत्या. दरम्यान शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत हे त्या भेटीचे साक्षीदार होते.
हे सुद्धा वाचा : यंग ग्लोबल लीडर्सच्या यादीत आदित्य ठाकरे..!
वरळीतून नाही, तर कोपरी-पाचपाखाडीतून निवडणूक लढवतो ; आदित्य ठाकरेंचे शिंदेंना आव्हान