30 C
Mumbai
Wednesday, May 17, 2023
घरराजकीयवरळीतून नाही, तर कोपरी-पाचपाखाडीतून निवडणूक लढवतो ; आदित्य ठाकरेंचे शिंदेंना आव्हान

वरळीतून नाही, तर कोपरी-पाचपाखाडीतून निवडणूक लढवतो ; आदित्य ठाकरेंचे शिंदेंना आव्हान

आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा डिवचले असून वरळीतून माझी अनामत रक्कम जप्त होईल, असे जर तुम्हाला वाटत असेल, तर मी कोपरी – पाचपाखाडी या तुमच्या विधानसभा मतदरसंघात येऊन निवडणूक लढवेन, असे थेट आव्हान आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. या आधीही एकनाथ शिंदे गटातील नेते आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये निवडणूक लढवण्यावरून आव्हान-प्रतिआव्हाने देण्यात आली होती. शिवसेना ठाकरे गटाचे वर्चस्व असलेल्या वरळीतील जांबोरी मैदानात रविवारी कार्यकर्त्यांचा ‘निर्धार मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचले आहे. हिम्मत असेल तर वरळीतून निवडणूक लढवून दाखवा, असे आव्हान त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. (I’ll contest election from Kopari-Pachpakhadi, Aditya Thackeray’s challenge to Shinde)

I'll contest election from Kopari-Pachpakhadi, Aditya Thackeray's challenge to Shinde
अरे आवाज कुणाचा? कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला, शिवसेना झिंदाबाद अशी घोषणाबाजी करत उद्धव ठाकरे गटाने रविवारी शक्तिप्रदर्शन केले.

यावेळी ,मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपास्थित होते. अरे आवाज कुणाचा? कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला, शिवसेना झिंदाबाद अशी घोषणाबाजी करत उद्धव ठाकरे गटाने रविवारी शक्तिप्रदर्शन केले. आदित्य ठाकरे यांनी सुरुवातीपासूनच थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले असून मी राजीनामा देतो, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन माझ्याविरोधात वरळीतून निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान मुख्यमंत्री शिंदे यांना दिले होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर प्रत्यक्ष टीका न करता शिंदे-फडणवीस गटातील नेत्यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला होता. रविवारी झालेल्या ‘निर्धार मेळाव्यात पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांनी शिंदे यांना आमने-सामने लढण्यासाठी डिवचले आहे. आता तर शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातच त्यांना आव्हान देण्यात आले आहे. यावर शिंदे-फडणवीस यांच्या गोटातून काय प्रतिक्रिया व्यक्त होते ते पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

यायावेळी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनीही कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी विधिमंडळातील गटनेते अजय चौधरी, विधान परिषद आमदार सुनील शिंदे आणि सचिन अहिर, मुंबईचे माजी महापौर महादेव देवळे आणि स्नेहल आंबेकर आदी उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा

निम्मे मतदार ठरवणार पुण्यातील 2 नवे आमदार; कसब्यात धंगेकर यांचाच डंका; चिंचवड जगतापांचेच राहणार; पत्रकारांना पाकिटे!

मी औरंगाबादमध्ये जन्मलो आणि औरंगाबादमध्येच मरणार ! इम्तियाझ जलील

कसबा, पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीत राडा, भाजपच्या माजी नगरसेवकाचा मतदारावर हल्ला

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी