33 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
Homeराजकीयमहायुतीला हरवण्यासाठी मविआ एकजुटीने निवडणूक लढवणार! जागावाटपाचे सूत्र हाती; काँग्रेसला सर्वात कमी...

महायुतीला हरवण्यासाठी मविआ एकजुटीने निवडणूक लढवणार! जागावाटपाचे सूत्र हाती; काँग्रेसला सर्वात कमी जागा

मुंबईमध्ये महाविकासआघाडी (MVA) च्या महत्त्वाच्या नेत्यांची एकत्रितपणे बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये महाविकासआघाडीच्या नेत्यांच्या सभा घ्यायची रणनिती ठरवण्यात आली आहे. या सभांमधून केंद्र सरकारला लक्ष्य करण्याचं महाविकासआघाडीच्या नेत्यांनी ठरवलं आहे. त्याचप्रमाणे शिंदे-फडणवीस (शिवसेना आणि भाजप) या महायुतीला हरवण्यासाठी महाविकास आघाडीत ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही घटक पक्षांनी निवडणुकांना एकत्रित सामोरे जाण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार त्यांनी लोकसभा मतदारसंघाच्या जागावाटपाला आतापासूनच सुरुवात केली आहे.

राज्यात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे आतापासूनच वारे वाहत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकत्र आला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मविआच्या कार्यकर्त्ये सभा घेत एकत्रित आले आहेत. भाजपसोबत कधीही युती होणार नाही, असा दावा करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मविआ कार्यकर्त्यांना एकजुटीने निवडणूक लढण्याचे आवाहन केले.

विशेषतः मागील लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या जागांचा निकष समोर ठेवत ठाकरे गट 21, काँग्रेस 8 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 19 अशाप्रकारच्या जागावाटपाचे सूत्र आघाडीच्या बैठकीत मांडण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या बैठकीनंतर वाय.बी.चव्हाण सेंटरमध्ये तीनही पक्षांच्या नेत्यांनी भाषणं केली. उद्धव ठाकरे भाषणाला उभे राहिले तेव्हा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. भाषणादरम्यान, तुम्ही सगळे मिळून निवडणूक लढायला तयार आहात का? जिल्हा परिषद, महानगरपालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र लढण्याची तयारी आहे का? आपण जर असे केले नाही तर देशात हुकूमशाही दिसेल,” असे मत ठाकरे यांनी मांडले.

पंतप्रधानपदासाठी ठाकरे गट विशेषतः संजय राऊतांकडून उद्धव ठाकरे यांचं नाव चर्चेत आणलं जातं. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंतप्रधानपदासाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा सुरु असते. उद्धव ठाकरे यांच्या भाषणावेळी एका उत्साही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने देश का पंतप्रधान कैसा हो, शरद पवार जैसा हो अशी घोषणा दिली.

दरम्यान 2 एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर येथून पहिल्या राज्यव्यापी मोहिमेची सुरुवात करणार आहे. मविआचे तिन्ही पक्ष – शिवसेना (UBT), राष्ट्रवादी आणि काँग्रेस-सात संयुक्त रॅली काढणार असून त्यांना वरिष्ठ नेते संबोधित करतील. छत्रपती संभाजीनगरनंतर नागपूर (16 एप्रिल), मुंबई (1 मे), पुणे (14 मे), कोल्हापूर (28 मे), नाशिक (3 जून) आणि अमरावती (11 जून) येथे मोर्चे होणार आहेत.

हे सुद्धा वाचा :

विधीमंडळात गदारोळ; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून मविआ आक्रमक

महाराष्ट्राचं बजेट म्हणजे भ्रमाचा भोपळा…; विधानसभेच्या पायऱ्यांवर मविआची जोरदार घोषणाबाजी

कसबा पोटनिवडणुकीच्या निकालाने हुरळून जाऊ नका; शिंदेचा मविआला टोला

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी