33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्र“तिच्यासारखं सुंदर दिसण्यापेक्षा…” पाहा काय म्हणतेय तेजश्री प्रधान

“तिच्यासारखं सुंदर दिसण्यापेक्षा…” पाहा काय म्हणतेय तेजश्री प्रधान

मराठी मालिकांमधून घराघरात पोहोचलेल्या लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) हे नाव नेहमीच आघाडीवर आहे. तेजश्रीचे साधे राहणीमान, चेहऱ्यावरील सुंदर हास्य आणि तिच्या वेगळ्या अभिनयामुळे तेजश्री कायमच चर्चेत आहे. दरम्यान ती सोशल मीडियावर देखील सक्रीय आहे. ती तिच्या आयुष्यात घडणाऱ्या काही ठराविक घडामोडी चाहत्यांशी शेअर करत असते. नुकताच जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. याधर्तीवर तेजश्रीने तिच्या चाहत्यावर्गातील महिलांना एक खास सल्ला दिला आहे.

तेजश्री प्रधानने ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेत जान्हवी ही व्यक्तिरेखा साकारली होती. तिच्या या मालिकेतील भूमिकेचे आजही तिचे कौतुक केले जाते. नुकतंच तेजश्रीने इन्स्टाग्रामवर स्वत:चा एक गोड फोटो शेअर केला आहे. त्यात ती केस मोकळे सोडून बसल्याचे दिसत आहे. तसेच ती छान स्मितहास्य करत आहे. या फोटोखाली तिने ‘हे सुंदरे, तिच्यासारखं सुंदर दिसण्यापेक्षा…तुझ्यासारखं (स्वतःसारखं) सुंदर हो!! #हॅप्पीलाईफ’, अशा आशयाचे मजकूर टाकत तिने आनंदी जीवनाचा एक सालस सल्ला खास महिलांना उद्देशून दिला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tejashri Pradhan (@tejashripradhan)

विशेषतः आपल्या मनमोहक सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणून तेजश्री प्रधानला ओळखले जाते. नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमांमधून तेजश्री प्रधान प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. तेजश्री प्रधान हिने ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली होती. तिची ही भूमिकाही चांगलीच गाजली होती.

हे सुद्धा वाचा : 

राणादा आणि पाठकबाईंचं लग्नानंतरचं पहिलं व्हॅलेंटाईन डे; खास क्षण सोशल मिडियावर व्हायरल

गुजरातच्या पाणीपुरीवाल्या मोदीची सोशल मिडियावर धूम! व्हिडिओ होतोय व्हायरल

बॉलिवूडचे क्युट कपल सिद्धार्थ आणि कियारा झाले विवाहबद्ध; लग्नाचे फोटो पाहा

तेजश्रीने पुढे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये देखील आपली छत उमटविली आहे. ती सध्या काय करते, झेंडा, लग्न पहावे करून, डॉक्टर प्रकाश बाबा आमटे द रियल हिरो, अशी एकदा व्हावे, जजमेंटल, हजारी, बाबलो बॅचलर यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिने भूमिका साकारून प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी