29.2 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeमनोरंजनगुजरातच्या पाणीपुरीवाल्या मोदीची सोशल मिडियावर धूम! व्हिडिओ होतोय व्हायरल

गुजरातच्या पाणीपुरीवाल्या मोदीची सोशल मिडियावर धूम! व्हिडिओ होतोय व्हायरल

जगात एकसारख्या दिसणाऱ्या व्यक्ती कुठेना कुठे असतातच. आपल्या चेहऱ्याशी साम्य असणारी व्यक्ती जगाच्या पाठीवर कुठेतरी असेल ही कल्पनाच कसली भारी आहे ना. जरा विचार करा अचानक एखाद्या दिवशी तुमच्यासारखी हुबेहुब दिसणारी व्यक्ती तुम्हाला भेटली तर? गोंधळच उडेलना. असाच काहीसा मजेशीर गोंधळ सोशल मिडियावर पाहायला मिळाला आहे. इंटरनेटवर अनेकदा सेलब्रेटिंना साम्य दिसणारे व्यक्ती आपल्याला पहायला मिळाल्या. राजकीय क्षेत्रातही याचा ठसा आहे. इंटरनेटवर वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखे दिसणारे अनेक लोक शोधण्यात यशस्वी झाले आहेत. आणि पुन्हा एकदा पांढरे केस, छाटलेली दाढी, कुर्ता-चुरीदार आणि नेहरू जॅकेट घातलेला माणूस अगदी भारतातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा दिसत होता. (Panipuri seller Modi)

वडोदरा येथील एका फूड ब्लॉगरने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. जो सध्या सोशल मिडियावर प्रचंड धुमाखुळ घालत आहे. त्याचे एकमेव कारण पीएम सारखीच व्यक्तिरेषा असणारी व्यक्ती. त्यांच्या चेहऱ्याची बांधणी, पोशाख आणि बोलण्याची पद्धत अगदी नरेंद्र मोदींसारखा आहे. या व्हिडिओच्या सुरुवातीला चाट विक्रेत्याने अनिल भाई खट्टर अशी स्वतःची ओळख करून दिली आहे. ‘वो चाय वाले थे, मैं पानी पुरी वाला हूं’ असंही ते म्हणाले आहेत.

दोन आठवड्यापूर्वी पोस्ट केलेल्या या व्हायरल झालेल्या व्हिडिओला 10 मिलियन अधिक जणांनी लाईकस केले असून, 26 मिलियन पेक्षा जास्त वेळा हा व्हिडिओ पहिला गेला आहे. या व्हिडीओमध्ये आपल्याला सुरवातीला नरेंद्र मोदी पाणी पुरी विकत आहेत, असं वाटतं मात्र नंतर आपल्याला असं लक्षात येईल की हे पंतप्रधान नरेंद्र मोदी नाही तर त्यांच्या सारखे दिसणारे गृहस्थ आहे. यांचा लूक हूबेहूब नरेंद्र मोदी यांच्यासारखा आहे त्यामुळे ते विशेष चर्चेत आहे.

कोण आहेत हे गृहस्थ?
मोदींसारखे दिसणाऱ्या या गृहस्थाचं नाव अनिलभाई ठक्कर आहे. त्यांच्या शॉपचं नाव तुलसी पाणीपूरी असून गुजरातच्या वल्लभ विद्यानगर, आनंद येथे ते पाणी पुरी विकतात. अनिलभाई ठक्कर वयाच्या पंधराव्या वर्षापासून पाणीपूरीचा व्यवसाय करतात. त्यांचा गेटअप आणि साइड फेस मोदींसारखाच आहे, म्हणून लोक त्यांना चक्क मोदी म्हणून हाक मारतात. अनिलभाई म्हणतात, मोदी हे चहावाले होते तर मी पाणीपुरीवाला आहे. ते पाच पदार्थांचा व्यवसाय करतात त्यात पाणीपूरी, भेलपूरी, शेवपूरी, दहीपूरी आणि बास्केट चाटचा समावेश आहे.

हे सुद्धा वाचा :

हृदयस्पर्शी: IPS लेकीने केला DGP वडिलांना सॅल्यूट; व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल

राणादा आणि पाठकबाईंचं लग्नानंतरचं पहिलं व्हॅलेंटाईन डे; खास क्षण सोशल मिडियावर व्हायरल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाची ठाण्यात, राज्यात, सोशल मीडियावर धूम!

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी