30 C
Mumbai
Thursday, May 11, 2023
घरक्राईमनात्याला काळिमा : सासरच्यांनी केले अमानुष कृत्य; सुनेचे हातपाय बांधून मासिक पाळीतील...

नात्याला काळिमा : सासरच्यांनी केले अमानुष कृत्य; सुनेचे हातपाय बांधून मासिक पाळीतील रक्त विकण्याचा अघोरी प्रकार

देशात नुकताच जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या धर्तीवर महाअर्थसंकल्पात देखील महिलांसाठी विशेष योजना आखल्याचे शिंदे-फडणवीस सरकारने घोषित केले. त्यांनतर आज पुण्यातून महिला अत्याचारावरील एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. मासिक पाळी सुरू असताना महिलेचा छळ करून अमानुष अघोरी कृत्य केल्याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी पतीसह सात जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या अघोरी कृत्यामुळे समाजातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. (Inhuman act: Selling menstrual blood by tying daughter-in-law’s hands and feet in Pune)

पुणे येथील पीडित महिलेचे (वय 27) मानसिक आणि लैंगिक शोषण केल्याप्रकरणी तिने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संबंधित फिर्यादीनुसार, पती सागर ढवळे, सासू अनिता ढवळे, सासरे बाबासाहेब ढवळे, दीर दीपक ढवळे, मावस दीर विशाल तुपे, भाचा रोहन मिसाळ, महादू कणसे (सर्व रा. बीड) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींच्या विरुद्ध अनैसर्गिक कृत्य, विनयभंग, शारिरिक मानसिक छळ तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अघोरी प्रथा जादुटोणा प्रतिबंधक अधिनियम आदी कलमांनुसार गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

विवाहानंतर पीडित महिला बीड जिल्ह्यातील कामखेडा गावात पतीच्या घरी राहत होती. पतीसह नातेवाईकांनी तिचा शारिरिक आणि मानसिक छळ केला जात होता. मासिक पाळी दरम्यान आरोपींनी संगनमत करुन महिलेशी अघोरी कृत्य केले, असे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. छळामुळे महिला माहेरी निघून आली. त्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक शुभांगी मगदूम तपास करत आहेत.

पीडित महिलेच्या सासरच्यांनी जादुटोणा करण्यासाठी तिचे हातपाय बांधून सुनेचं मासिक पाळीतील रक्त विकण्याचा अघोरी प्रकार केल्याची घटना घडली. या प्रकरणी पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यानंतर आता या घटनेवर राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केली.

चंद्रकांत पाटील म्हणाले, पुण्यात सासरच्या लोकांनी एका महिलेला मासिक पाळीच्या वेळी हातपाय बांधून अत्यंत विचित्र प्रकार केला. ते सार्वजनिकपणे बोलावंही वाटत नाही. विज्ञान युग असताना समाजात भयंकर अंधश्रद्धा वाढत चालली आहे. अंधश्रद्धेमुळे समाजात अशा भयानक गोष्टी घडत आहेत. या प्रकरणी मी पुणे पोलीस आयुक्तांशी बोललो. त्यानंतर ही घटना पुणे ग्रामीणमधील असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांशी बोललो. आरोपींविरोधात जेवढी कडक कलमं लावता येतील तेवढी कडक कलमं लावा असे निर्देश दिले, अशी माहिती चंद्रकांत पाटलांनी दिली.

असे प्रकार करताना कायद्याची जी भीती वाटली पाहिजे ती त्यांना वाटत नाही, त्यांना कायद्याची भीती वाटली पाहिजे. पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कर्तव्यदक्ष आणि संवेदनशील आहेत. त्यामुळे दिवसभरात बऱ्याच गोष्टी घडतील, असंही चंद्रकांत पाटलांनी नमूद केलं.

हे सुद्धा वाचा : 

अंधश्रद्धा पसरविणाऱ्या पुजाऱ्यावर गुन्हा दाखल!

अंधश्रद्धा निर्मूलनकारांचा विज्ञानावरही अविश्वास; राम कदम यांची खोचक टीका

नात्याला काळिमा : नराधम आईनेच पोटच्या मुलींना फेकले देहविक्रीच्या जाळ्यात

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी