29 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रThackeray Vs Shinde : वादग्रस्त दसरा मेळाव्यानंतर ठाकरे - शिंदे लग्नबेडीत, पत्रिका...

Thackeray Vs Shinde : वादग्रस्त दसरा मेळाव्यानंतर ठाकरे – शिंदे लग्नबेडीत, पत्रिका व्हायरल

शिंदेंनी ठाकरेंना मागणी घातल्याच्या एका वृत्ताने संपुर्ण राज्यात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे, याबाबची पत्रिकाच सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

यंदाच्या वर्षी वादग्रस्त ठरलेले शिवसेनेचे दसरा मेळावे अजूनही सगळीकडे चर्चेतून गाजत आहेत. कधी नव्हे तर यावर्षी महाराष्ट्राने शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे असे दोन दसरा मेळावे अनुभवले. यामध्ये ‘किसमें कितना है दम’ म्हणत सभेसाठी जमणारी गर्दी, भाषणे आणि त्यातून केलेली शाब्दिक फटकेबाजी अशी सगळ्याच बाबतीत चढाओढ झाल्याचे पाहायला मिळाले, त्यामुळे ठाकरे वि. शिंदे असा वाद आता आणखीच चिघळला असून त्यांच्यातील वाढच्या दुराव्याविषयी लोक चिंता व्यक्त करू लागले आहे. दरम्यान शिंदेंनी ठाकरेंना लग्नासाठी मागणी घातल्याच्या एका वृत्ताने संपुर्ण राज्यात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे, याबाबची पत्रिकाच सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जुन्नर तालुक्यातील वडगावसहाणी या गावात ठाकरे आणि शिंदे यांच्यात सोयरीक जुळल्याने ठाकरेंची वरात आता थेट शिंदेंच्या घरात पोहोचणार आहे. एकीकडे शाब्दिक फटकाऱ्यांतून एकमेकांना पिळून काढणारे ठाकरे शिंदे यांची चर्चा सुरू असताना दुसरीकडे ठाकरे – शिंदे घराण्याच्या सोयरीकीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. यामध्ये वडगावसहाणी गावचे शिवसेनेचे माजी विभागप्रमुख आणि सरपंच तसेच निष्ठावंत शिवसैनिक खंडेराव विश्राम शिंदे यांचे पुतणे चिरंजीव विशाल आणि आंबेगाव तालुक्यातील साल गावतील ठाकरे परिवाराची सुकन्या चि. सौ. का. अनुराधा यांचा शुभविवाह लवकरच पार पडणार आहे.

Thackeray Vs Shinde : वादग्रस्त दसरा मेळाव्यानंतर ठाकरे - शिंदे लग्नबेडीत, पत्रिका व्हायरल

 

हे सुद्धा वाचा…

PM Modi : पुण्यातील एका फ्लॅटमध्ये पंतप्रधानांच्या हत्येचा कट! पोलिसांकडून एकाला अटक

Adipurush Movie : ‘आदिपुरुष’ टीझरवरुन टीका होणं हे दुर्दैवी, मनसेचा भाजपला टोला

Aryan Khan : शाहरुख-गौरीचा मुलगा करणार मनोरंजन क्षेत्रात डेब्यू; आर्यनच्या खांद्यावर विशेष जबाबदारी

शिवसेनेत ठाकरे – शिंदे यांच्या तुटलेल्या नात्यामुळे अनेक शिवसैनिक नाराज झाले, परिणामी दोन गट निर्माण झाले आणि खरी शिवसेना कोणाची असा वादच उफाळला परंतु प्रकरण कितीही शिगेला पोहोचले असले तरीही अनेक शिवसेनाप्रेमी शिंदे – ठाकरेंनी एकत्र यावे अशी मनोमन कामना करीत आहेत आणि अशावेळी जुन्नर येथील ठाकरे – शिंदे यांच्या सोयरीकीने त्यांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत. दरम्यान, ज्याप्रमाणे आम्ही सर्वसाधारण लोक शिंदे आणि ठाकरेंचं मनोमिलन करत आहोत, तसंच चित्र येत्या काळात महाराष्ट्रात बघायला मिळावं. शिंदे-ठाकरे राजकारणात देखील एकत्र यावेत, अशी इच्छा मुलाचे काका शिवसेनेचे माजी विभागप्रमुख खंडेराव विश्राम शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

सदर लग्न 8 ऑक्टोबर 2022 रोजी म्हणजेच उद्या पार पडणार आहे. सध्याच्या या तणावपूर्ण राजकीय वातावरणात ठाकरे शिंदे यांच्या सोयरीकीमुळे नातेवाईकांमध्ये आनंद पाहायला मिळत आहे, शिवाय अनेकांचे या निमित्ताने मनोरंजन सुद्धा होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील संबंध पुर्णपणे बिनसले असले तरीही जुन्नर येथील हे दोन्ही परिवार चांगलेच चर्चेचा विषय ठरत आहेत, त्यामुळे या प्रसंगाच्या निमित्ताने का होईना पुन्हा ठाकरे – शिंदे सगळा राग विसरून एकत्र येऊन शिवसेना सांभाळतील अशी भाबड्या आशांची अटकळ सुद्धा अनेकांकडून बांधली जात आहे.

दरम्यान, अवघ्या आठ दिवसांपूर्वी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोण घेणार यावर कोर्टात खटला चालू होता त्याचवेळी जुन्नरमध्ये ठाकरे आणि शिंदे कुटुंबियांमध्ये कांदेपोह्यांचा कार्यक्रम रंगला होता. चांगलं स्थळ असल्याने एकमताने हा विवाह ठरवण्यात आला. या संपुर्ण प्रकरणावर बोलताना नवरदेवाने प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे की, आमचं लग्न ठरताना अशा प्रकारची प्रसिद्धी मिळेत असं वाटलं नव्हतं. मात्र त्यानंतर राजकीय वातावरण पाहून आणि मिळत असलेली प्रसिद्धी पाहून आनंद होत आहे असे म्हणून त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी