27 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्र'सफाई कामगारांचे पगार द्यायला ठाणे महानगर पालिकेकडे पैसे नाहीत मात्र आयपीएल चे...

‘सफाई कामगारांचे पगार द्यायला ठाणे महानगर पालिकेकडे पैसे नाहीत मात्र आयपीएल चे बॅनर लावायला पैसे आहे’

टीम लय भारी

ठाणे: ठाण्यामध्ये (Thane)ठाणे महानगरपालिका(thane municipal corporation) कडे पैसे नाहीत अशी बोंब करत सफाई कर्मचार्‍यांचे पगार गेल्या तीन महिन्यापासून दिले नाही, शिवाय घाणीमध्ये काम करत असताना कोणतीही सुरक्षा साधने ठाणे महानगरपालिकेने पुरवली नाहीत. मात्र आयपीएल(IPL) चे बॅनर संपूर्ण ठाणे शहरात महानगरपालिकेने लावले आहेत.(Indian Premier League) त्याबद्दल ठाणेकर आणि भाजप कार्यकर्ते तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

ठाणे येथील वागळे इस्टेट भागातील सी पी तलाव परिसरातील कचराभूमीवर काम करणाऱ्या सफाई कामगारांना ठेकेदाराने गेल्या तीन महिन्यांपासून वेतन दिलेले नसून त्याच्या निषेधार्थ म्युनिसिपल लेबर युनीयनच्या(Municipal Labour Union) माध्यमातून कामगारांनी बुधवारी( २३मार्च) सी पी तलाव ते महापालिका मुख्यालय असा अर्धनग्न अवस्थेत मोर्चा काढला होता. महापालिका मुख्यालयासमोर येताच कामगारांनी धरणे धरत जोरदार घोषणाबाजी केली.

ठाणे महापालिका क्षेत्रात((thane municipal corporation) दररोज निर्माण होणाऱ्या कचऱा सी पी तलाव येथे नेला जातो आणि त्यानंतर कचऱ्याचे वर्गीकरण करून तो कचराभुमीवर नेला जातो. या कचरा वाहतूकीच्या कामासाठी पालिकेने मे. मेट्रो वेस्ट हॅण्डलिंग प्रा. लि. या कंपनीची नेमणूक केली असून २०१७ पासून ही कंपनी हे काम करीत आहे. हे काम १० वर्षाकरिता या कंपनीला देण्यात आले आहे. या ठेकेदारामार्फत सी.पी. तलाव येथे सुमारे ६१ कामगार काम करीत असून त्यात वाहन चालक, वाहन चालक सहाय्यक, सफाई कामगार आणि मेंटेनन्स कामगार यांचा समावेश आहे.

या ठेकेदारावर प्रशासनाच्या संबंधित विभागाचा अंकुश नसल्यामुळे त्याने गेल्यावर्षी दिवाळीत कामगारांना बोनस दिला नाही. ऐवढेच नव्हे तर मार्च महिना संपत आला तरीही कामगारांना जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे वेतन दिलेले नाही. ठेकेदाराच्या या हलगरजीपणामुळे या कामगारांवर व त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे,

ठाणे शहर हे स्मार्टसिटी(Thane Smart City) म्हणून ओळखले जाते. या ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना कोणती गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे हे समजण्या इतकी त्यांची बुद्धी नसेल तर अशा बेअक्कल अधिकाऱ्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी भाजपाच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. ठाण्याचे पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) साहेब यांनी या विषयात लक्ष घालून तात्काळ कारवाई करावी व सफाई कामगारांचा टीम महिन्यापासूनचे थकलेले वेतन त्याने मिळवून द्यावे. पैशाची उधळपट्टी करणाऱ्या ठाणे महानगर आयुक्तांना जाब विचारावा व योग्य ती कारवाई करावी.

अगोदरच कोरोनामुळे(Covid 19)ठाणे महानगरपालिका दिवाळखोरीत निघाली आहे आणि अशावेळी अशी उधळपट्टी किती योग्य आहे? याअगोदर सुद्धा कोरोना काळात जे ट्रॅफिक वॉर्डन रस्त्यावर उभे राहून जीवाची पर्वा न करता काम केले होते अशांचा पगार सुद्धा ठाणे महानगरपालिकेने एक वर्षानंतर दिला. त्यामुळे गरीब गरजू गरजेपोटी साफसफाई सारखे काम करणाऱ्या लोकांना पगार न देणे ही अतिशय खेदाची बाब आहे. याबाबत लवकरच कायदेशीर गोष्टींचाही विचार करून , योग्य ती कायदेशीर कारवाई बाबतीतही आम्ही विचार करत आहोत अशी माहिती भाजपा चिटणीस ठाणे शहर श्री दत्ता घाडगे यांनी दिली.

 

हे सुध्दा वाचा 

ठाणे महापालिका मुख्यालयावर कंत्राटी कामगारांचे अर्धनग्न आंदोलन

एकनाथ शिंदेंचा टोला, आता होणार काम, आता खरा राजूशेठ यांना लावावा लागणार बॅनर!

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी