29 C
Mumbai
Friday, July 5, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्र सरकारने कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी 'ही' केली उपाययोजना

महाराष्ट्र सरकारने कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘ही’ केली उपाययोजना

टीम लय भारी

मुंबई :-  देशात कोरोनाचा दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढत आहे. तसेच महाराष्ट्रात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहून अनेक ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आले आहेत तर काही ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने कोरोना नियंत्रणासाठी कंबर कसली आहे. सरकारने कोरोना संसर्गावर नियंत्रणासाठी आणि संसर्गाची साखळी तोडण्यासाठी ‘3T’ उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. स्वतः राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे. राज्यात रविवारी कोरोना रुग्णांच्या संख्येने एका दिवसात ४० हजार रुग्णांचा टप्पा पार केलाय. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत.

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, “राज्य सरकार ट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रीटमेंट या त्रिसुत्रीवर भर देत आहे. याशिवाय आम्ही महाराष्ट्रात कोरोना लसीकरणाची केंद्रे वाढवण्यासाठीही प्रयत्न करत आहोत. सध्या राज्यात बेड्स, औषधे आणि डॉक्टर्सची कोणतीही कमतरता नाही. जर कोरोना रुग्णांची संख्या वाढतच राहिली तर आम्हाला कोणता ना कोणता निर्णय घ्यावा लागणार आहे.”

नागरिक उशिरा रुग्णालयात जात असल्याने आयसीयू आणि ऑक्सिजनचे बेड्स संपत आहेत’

दरम्यान या आधी राजेश टोपे यांनी नागरिकांना चाचणी करण्याचे आवाहन केले आहे. “नागरिक उशिरा रुग्णालयात जात असल्याने रुग्णालयांमधील आयसीयू आणि ऑक्सिजनचे बेड्स संपत आहेत. या नागरिकांनी वेळेवर चाचणी न केल्याने हे परिणाम होत आहेत. म्हणूनच सर्व नागरिकांना वेळेवर कोरोना चाचणी करण्याचे आवाहन करतो. राज्यात लॉकडाऊन लागू करणे हा सरकार पुढील सर्वात शेवटचा पर्याय आहे. कुणालाही राज्यात लॉकडाऊन नको आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ही लॉकडाऊन लागू करण्याची इच्छा नाही. तो आमच्यासाठी शेवटचा मार्ग आहे,” असे मत राजेश टोपे यांनी व्यक्त केले आहे.

नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागावा असे आम्हाला वाटत नाही”

लॉकडाऊन लागू करणे चुकीचे नाही, परंतु त्यामुळे खूप अडचणी तयार होतील, असे ही त्यांनी नमूद केले. लॉकडाऊनवरुन महाविकासआघाडीच्या अनेक नेत्यांमध्ये एकवाक्यता नसल्याचे समोर येत आहे. राजेश टोपे यांचे मंत्रिमंडळातील सहकारी नवाब मलिक यांनी लॉकडाऊनच्या उपयोगितेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक म्हणाले, “लॉकडाऊन लागू केल्यास लोकांवर याचा वाईट परिणाम होईल. नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागावा असे आम्हाला वाटत नाही.”

फेरीवाले आणि कामगारांना आधी आर्थिक भरपाई द्या”

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही राज्यात लॉकडाऊनला विरोध केला आहे. “सरकारने लॉकडाऊनचा सर्वाधिक परिणाम होणाऱ्या फेरीवाले आणि कामगारांना आधी आर्थिक भरपाई द्यावी आणि मग लॉकडाऊन लागू करावा, असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.”

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी