26 C
Mumbai
Saturday, August 6, 2022
घरमहाराष्ट्रभूगर्भातून येतो गडगडण्याचा आवाज

भूगर्भातून येतो गडगडण्याचा आवाज

टीम लय भारी

वसमत: वसमत तालुक्यात मागील काही दिवसात झालेल्या पावसानंतर आता भूगर्भातून गडगडण्याचा आवाज येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी सकाळी पावणे सात वाजता व त्यानंतर सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास दोन वेळा जमीन हादरली.

मात्र त्याची नोंद भूकंपमापक यंत्रामध्ये झाली नाही. गावकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. प्रशासन नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.वसमत तालुक्यातील कुरुंदा व परिसराला पावसाने झोडपल्यानंतर पुरामुळे पिकांचे व घरांचे प्रचंड नुकसान झाले. या परिस्थितीतून अद्यापही गावकरी सावरले नाहीत. त्यानंतर आता भूगर्भातून आवाज येण्याची मालिका सुरू झाली आहे. वसमत तालुक्यातील वापटी, कुपटी, राजवाडी, पांगरा शिंदे, तसेच बोल्डा परिसरातील काही भागांमधून भूगर्भातून आवाज येऊ लागले आहेत.

गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी पावणे सात वाजता व त्यानंतर सकाळी सव्वा आठ वाजता भूगर्भातून गडगडल्या सारखा आवाज आला. अचानक आलेल्या या आवाजामुळे गावकऱ्यांमधून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवित व वित्तहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे.

हे सुध्दा वाचा:

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरेंचे मनसैनिकांना पत्र

काय….? डासांपासून होणार आता लवकरच सुटका

एसी लोकलचा प्रवाशांना दणका; स्टेशन आले तरी दरवाजे उघडलेच नाहीत

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!