35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रवाहतुकोंडीला अडथळा ठरणा-या बेवारस वाहनांवर ठामपाची धडक कारवाई

वाहतुकोंडीला अडथळा ठरणा-या बेवारस वाहनांवर ठामपाची धडक कारवाई

टीम लय भारी 

ठाणे : रस्ता वाहतुकीला अडथळा ठरणा-या आणि नो पार्किंग मध्ये अनेक दिवसांपासून उभ्या असलेल्या भंगार अवस्थेतील बेवारस वाहनांवर महापालिकेच्यावतीने कारवाई करण्यात आली. ठाणे (TMC) जिल्ह्याचे पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे व ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या निर्देशानुसार अतिक्रमण विभाग, नौपाडा-कोपरी व वागळे प्रभाग समिती आणि वाहतुक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बेवारस, नादुरूस्त व अपघातग्रस्त वाहनांवर ही धडक कारवाई करण्यात आली. (Tmc to take action aginest abandoned vehicles an acution)

तसंच कार्यक्षेत्रातील स्वच्छता, सुरक्षितता आणि अपघात यासारखे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. बेवारस वाहनांमुळे रहदारीस अडथळा निर्माण होऊन अनेक प्रश्न निर्माण होत असल्याचे निदर्शनास आल्यानं अशा वाहनांवर ठोस आणि कालमर्यादेत कारवाई करण्यासाठी स्थानिक (TMC) शासनानं सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगानं बेवारस वाहनांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

त्यालाच अनुसरून अनधिकृतपणे उभ्या असलेल्या एकूण ९ दोन चाकी, ३ चार चाकी व ८ तीन चाकी भंगार वाहने उचलण्याची कारवाई करण्यात आली. सदर कारवाई उप आयुक्त शंकर पाटोळे यांनी वाहतुक विभागाचे पोलिस व अतिक्रमण विभागाचे कर्मचारी यांच्या साहाय्याने केली. यापुढे रस्त्यांवरील जुन्या, नादुरूस्त, भंगार वाहनांवर तसेच नो पार्किंगमध्ये (TMC) अनधिकृतपणे लावलेल्या वाहनांवर नियमितपणे कारवाई करणार असल्याचेही अतिक्रमण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत वाहने लावली जात असल्याने मोठया प्रमाणात वाहतुक कोंडी होते. या कोंडीमुळे वाहन चालक व पादचा-यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. नौपाडा-कोपरी व वागळे प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील रस्त्यांवर गेल्या अनेक दिवसांपासून दोन चाकी, तीन चाकी, चार चाकी वाहने अनधिकृतपणे उभी होती. सदरच्या जुन्या, नादुरूस्त-भंगार वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा होत होता तसेच सकाळी व सायंकाळच्या सुमारास मुख्य रस्त्यावर वाहतुक कोंडी होऊन अपघाताची शक्यताही नाकारता येत नव्हती. त्यामुळे ठाणे (TMC) जिल्ह्याचे पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे व ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सदरच्या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश अतिक्रमण विभागास दिले होते.

हे सुद्धा वाचा : 

एसटी कर्मचाऱ्यांचा काल आनंद तर आज सिल्व्हर ओकवर आक्रोश

Mumbai: BMC seizes 782 abandoned vehicles to free up parking space

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी