36 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रविदर्भMNS : भाजपला आम्ही फारसे महत्त्व देत नाही, असे सांगून मनसेने प्रचाराचा...

MNS : भाजपला आम्ही फारसे महत्त्व देत नाही, असे सांगून मनसेने प्रचाराचा नारळ फोडला

राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुका जवळ येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्ष आपली मार्चे बांधणी करत आहे. मनसेने (MNS) तर विदर्भातून निवडणूक प्रचाराचा नाराळ फोडला आहे. या वेळी सगळीकडे आपले उमेदरवार उभे करण्याची तयारी मनसेकडून केली जात आहे.

राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुका जवळ येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्ष आपली मार्चे बांधणी करत आहे. मनसेने (MNS) तर विदर्भातून निवडणूक प्रचाराचा नाराळ फोडला आहे. या वेळी सगळीकडे आपले उमेदरवार उभे करण्याची तयारी मनसेकडून केली जात आहे. आगामी न‍िवडणुकांमध्ये मनसे आणि भाजपची युती होण्याची शक्यता अनेकांनी वर्तवली होती. मात्र ती शंका फोल ठरणार आहे. कारण मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले आहे. भापजपला दाखवण्यापूरतेच आम्ही मित्र आहोत, त्यांना आम्ही फारसं महत्त्व देत नाही. आम्ही आमची युती होतेय असे कुठेही म्हटलेले नाही. आम्ही सगळया जागांवर लढणार आहोत. आमचे सगळयाच पक्षात मित्र आहेत असेही ते यावेळी म्हणाले.

राज ठाकरे 5 दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. ते नागपूर, चंद्रपूर, अमरावती येथील मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन चर्चा करणार आहेत. 22 तारखेपर्यंत त्यांचा हा दौरा असणार आहे. महानगर पालिका निवडणुका जवळ येत आहेत. तसा राजकीय रणधुमाळीला रंग चढत आहेत. प्रत्येक पक्षाचा नेता राज्यभर सभा घेत आहे. मनसेचा नागपूर महानगरपालिकेमध्ये एकही नगरसेवक नाही. त्यामुळे यावर्षी विदर्भात मनसे आपला झेंडा रोवण्याचा प्रयत्न करत आहे. राज ठाकरेनी आज स्थानिक प्रतिनिधींशी संवाद साधला. राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अलिकडे जवळीक वाढली आहे. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याल महत्त्व प्राप्त झाले आहे.

महाराष्ट्रात सद्या राजकीय पेचप्रंसग निर्माण झाला आहे. त्याचा फायदा यावेळेस मनसेला होऊ शकतो असे अनेकांना वाटते. कारण शिवसेनेमध्ये उभी फूट पडली. अनेक जण शिंदे गटात सामील झाले. राज्याच्या राजकारणाचा गाडा विस्कळीत करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही. त्यामुळे शिंदे गटाचे देखील अस्त‍ित्व धोक्यात आहे. भाजपचे तोडा फोडीचे कारनामे महाराष्ट्रातील जनतेला नक्कीच आवडलेले नाहीत असे अनेकांना वाटते. तसेच काँग्रेस पक्षाला पूर्वीचे दिवस राहिले नाहीत. या पक्षाला उतरती कळा लागली आहे. त्यामुळे राज्यात एक हाती सत्ता येणे तसे कठीण आहे. मात्र भाजप सर्वांत बलाढय पक्ष ठरतो आहे.

हे सुद्धा वाचा

Eknath Shinde Promise : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठवाडा भागात विकासकामांना गति देण्याचे आश्वासन दिले

Kaun Banega Crorepati : कोल्हापूरच्या कविता चावला बनल्या ‘केबीसी’ च्या 14 व्या मोसमाच्या पहिल्या करोडपति

Raj Thackeray : ‘माझ्या संभाजीनगरकरांच्या उरावर ही कसली घाण’

राष्ट्रावादी काँग्रेस मात्र कोणत्याही पक्षाला टक्कर देण्या इतका सक्षम आहे. साम, दाम, दंड, भेदाचा वापर करुन भाजप राजकाण करत आहे. अर्थांत भाजपच्या या रणनितीमध्ये मनसेचा किती टिकाव लागतो. ते येणारा काळच ठरवले. मनसे पक्ष प्रमुख्य राज ठाकरे यांच्या सभांना प्रचंड गर्दी असते. लोक त्यांची भाषणं आवडीने ऐकतात आणि ऐन निवडणुकीमध्ये त्यांना दगा देतात हा आतापर्यंतचा अनुभव आहे. मात्र दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होऊ शकतो. हे देखील नाकारता येणार नाही. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती विचार घेऊन मनसेचे नेते कामाला लागले आहेत हे मात्र खरे !

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी