29 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeक्रीडाOlympic : राज्यात लवकरच मिनी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांच्या तयारीला सुरूवात होणार

Olympic : राज्यात लवकरच मिनी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांच्या तयारीला सुरूवात होणार

राज्यात काही वर्षांनंतर मिनी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेत चांगले खेळाडू बनावते अशी अपेक्षा महाराष्ट्र ऑलिंप‍िक (Olympic)असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी व्यक्त केली. आज संघटनेच्या बैठकीला ते उपस्थ‍ित होते.

राज्यात काही वर्षांनंतर मिनी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेत चांगले खेळाडू बनावते अशी अपेक्षा महाराष्ट्र ऑलिंप‍िक (Olympic)असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी व्यक्त केली. आज संघटनेच्या बैठकीला ते उपस्थ‍ित होते. राज्यात यंदा राज्यस्तरावर विविध खेळांच्या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धा संदर्भात संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केले होती. या बैठकीत असोसिएशनचे महासच‍िव नामदेव शिरगावकर आणि राज्याचे नवनियुक्त क्रीडा आयुक्त सुहास दिवसे यांनी मार्गदर्शन केले.

महाष्ट्राचे कुस्तीगीर खाशाबा जाधव यांनी देखील महाष्ट्राला ऑलिंपीकमध्ये पहिले पदक मिळवून दिले होते. त्यांचा वारसदार घडवण्याची जबाबदारी राज्यातील सर्व क्रीडा संघटनांची आहे. इतर राज्यांप्रमाणे आपल्या राज्याचा देखील क्रीडा क्षेत्रात नावलौकीक वाढणे गरजेचे आहे.‍ पंजाब, हर‍ियाणा क्रीडाक्षेत्रात आघाडीवर आहेत. आपल्या संघटनांनी चांगले खेळाडू तयार करण्यावर भर दिला पाहिजे असेही अजित पवार यावेळी म्हणाले. आज ऑलिंपीक असोशिएशनची बैठक घेण्यात आली यावेळी ते बोलत होते. मिनी ऑलिंपीक क्रीडा स्पेर्धेत नैपुण्यशोध आणि विकास यावर देखील भर दिला पाहिजे. शासनातर्फे सर्वतोपरी सहकार्य मिळेल असे आश्वासन देखील अजित पवार यांनी द‍िले. तालुका आणि क्रीडा स्तरावर असलेल्या विविध क्रीडा संकुलांचा खेळाडूंना अधिक कसा फायदा होईल या विचार करावा लागेल.

हे सुद्धा वाचा

Taiwan : सावधान ! ‘या’ देशाला पुन्हा त्सुनामीचा धोका

Jharkhand Maoist Leader Arrest: 15 लाखांचे बक्षीस असलेल्या माओवादी नेत्याला महाराष्ट्र ATS ने केली अटक

Chandigarh University : धक्कादायक बातमी ! चंदीगड विद्यापीठात एक मुलगीच बनली 60 मुलींची शत्रू, सोशल मीडियावर केलेल्या लाजिरवाण्या कृत्याने 8 जणींचा आत्महत्येचा प्रयत्न

महाराष्ट्र ऑलिंपीक असोशिएशनने आगामी आठ वर्षांच्या विविध क्रीडाविषयक योजनांचे नियोजन केले आहे. आगामी 2028 व 2032 मध्ये होणाऱ्या ऑलिंपीक क्रीडा स्पर्धांमध्ये महाष्ट्राच्या खेळाडूंनी पदके जिंकावीत अशी अपेक्षा आहे. नैपुण्य तसेच विकासाच्या अनुशंगाने काही योजना आख्यल्या आहेत. आगामी मिनी ऑलिंप‍िक क्रीडा स्पर्धांची पायाभरणी करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाच्या राज्य संघटनेला भावी ऑलिंपीकपटूंचा शोध घेणे सोपे होणार आहे. ही स्पर्धा दिमाखदार आणि संस्मरणीय व्हाव्यात यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. या स्पर्धेसाठी क्रीडा ज्योतीचे आयोजन केले जाणार असून, प्रत्येक जिल्हयात ज्योतीचा प्रवास होणार आहे.

आगामी तीन वर्षांचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. प्रत्येक खेळाडू व‍ प्रश‍िक्षक यांची सव‍िस्तर माहिती आम्ही संकलीत करणार आहोत. त्यामुळे खेळाडूची पार्श्वभूमी त्याला आलेल्या अडचणींचा अभ्यास करून त्या सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. शालेय क्रीडा स्पर्धा सुरू करण्यास शासनाने मान्यता दिल्या आहेत. आता चांगले खेळाडू मिळू शकतात. या बैठकीमध्ये महाष्ट्र ऑलिंप‍िक असोस‍िएशनचे संलग्न क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी