32 C
Mumbai
Saturday, April 29, 2023
घरमहाराष्ट्र'अमृत'च्या व्यवस्थापकीय संचालकपदी विजय जोशी यांची नियुक्ती

‘अमृत’च्या व्यवस्थापकीय संचालकपदी विजय जोशी यांची नियुक्ती

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधनी (अमृत) या पुणे येथील संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर अपर जिल्हाधिकारी विजय जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय नागरी सेवा मंडळाने अपर जिल्हाधिकारी संवर्गातील पदोन्नतीने शिफारसीनुसार काही अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. (Vijay Joshi as Appoint Managing Director of Amrit Sanstha Pune)

डॉ. राणी ताटे यांची बदली नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात करमणूक शाखेच्या उपायुक्त म्हणून केली आहे. अनिल खंडागळे यांची बदली अमरावती येथील विभागीय लोकसेवा हक्क आयोग येथे उप सचिवपदी केली आहे. रविकांत कटकधोंड यांची बदली मुंबई शहर अपर जिल्हाधिकारीपदी केली आहे. संजीव जाधव यांची बदली अकोल्याचे अपर जिल्हाधिकारी म्हणून केली आहे. देवदत्त केकाणे यांची धुळ्याच्या अपर जिल्हाधिकारीपदी बदली केली आहे. तर अनिल खंडागळे यांची बदली अमरावती विभागीय लोकसेवा हक्क आयोगाच्या उप सचिवपदी करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

IAS Transfer : मुंबईतील दोन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
VIDEO : सत्तासंघर्षावर ॲड. उज्ज्वल निकम यांची खास मुलाखत
आता गुडीपाडवा, आंबेडकर जयंतीला मिळणार आनंदाचा शिधा; राज्य शासनाचा निर्णय

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी