33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमंत्रालयIAS Transfer : मुंबईतील दोन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

IAS Transfer : मुंबईतील दोन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

शिंदे-फडवणीस सरकारने बुधवारी (दि.२२) दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. IAS अमगोथू श्री रंगा नाईक आणि IAS अनिल भंडारी यांच्या बदलीचे आदेश मंत्रालय सामान्य प्रशासन विभागाने काढले आहेत. राज्यात संत्तांतर झाल्यापासून उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे सत्र सुरु आहे. गेल्या आठवड्यात देखील पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या. त्यानंतर आज पुन्हा दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. (IAS Transfer: IAS Amgothu Shri Ranga Naik and IAS Anil Bhandari are transferred)

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (MIDC) चे सहायक मुख्य कार्यकारी अधिकारी अमगोथू श्री रंगा नाईक यांची तसेच जीएसटी विभागाचे सहायक आयुक्त अनिल भंडारी यांची बदली करण्यात आली आहे.

अमगोथू श्री रंगा नाईक यांची मुंबई जीएसटी विभागाचे सहायक आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. तर अनिल भंडारी यांची एमआयडीसीचे सहायक मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

हे सुद्धा वाचा

IAS Transfer: राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

IAS Promotion : म्हैसकर दाम्पत्यासह सहा सनदी अधिकाऱ्यांना अतिरिक्त मुख्य सचिवपदी बढती

IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, महेंद्र कल्याणकरांचे प्रमोशन

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी