29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रRahit Pawar : ज्याला हाफकीन संस्था की व्यक्ती हे माहित नाही त्याला...

Rahit Pawar : ज्याला हाफकीन संस्था की व्यक्ती हे माहित नाही त्याला मी कशाला मस्का लावू?; रोहीत पवार यांची बोचरी टीका

'ज्याला पैसा आणि अहंकार जास्त आहे, ज्याला हाफकीन संस्था आहे की, व्यक्ती हेदेखील माहिती नाही, जो महाराष्ट्राला भिकारी बनविण्याची भाषा करतो, अशा व्यक्तीला मतदार संघात न येण्यासाठी मी कशाला मस्का लावू? राम शिंदे साहेब पुड्या सोडू नका,

‘ज्याला पैसा आणि अहंकार जास्त आहे, ज्याला हाफकीन संस्था आहे की, व्यक्ती हेदेखील माहिती नाही, जो महाराष्ट्राला भिकारी बनविण्याची भाषा करतो, अशा व्यक्तीला मतदार संघात न येण्यासाठी मी कशाला मस्का लावू? राम शिंदे साहेब पुड्या सोडू नका, ‘खेकड्या’ची चाल लोक स्विकारत नाहीत, हिम्मत असेल तर याचा पुरावा द्या, आणि यापुढे तुमच्याच प्रचाराला त्यांना जरूर बोलवा… मग मैदानात बघू’, अशी अशी बोचरी टीका कर्जत जामखेडचे आमदार रोहीत पवार यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यावर करत आमदार राम शिंदे यांना इशारा दिला आहे.

आमदार राम शिंदे यांनी चौंडी येथील त्यांच्या निवासस्थानी राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना दिवाळी फराळ कार्यक्रमामासाठी निमंत्रित केले होते. दिवाळी फराळ कार्यक्रमावेळी आमदार राम शिंदे यांनी रोहीत पवार यांच्यावर हल्लाबोल केला. यावेळी ते म्हणाले, आरोग्य मंत्री तानाजी सावंत दिवाळी फराळसाठी चौंडीला आले होते. यावेळी आमदार रोहीत पवार यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना दहावेळा फोन करुन कार्यक्रमासाठी येऊ नये असे सांगितले, त्यासाठी त्यांनी तानाजी सावंत यांना विनंत्या केल्या, असा आरोप आमदार राम शिंदे यांनी रोहीत पवार यांच्यावर करत तानाजी सावंत यांच्याशी माझे मित्रत्तवाचे संबंध आहेत. असे सांगितले. यावेळी त्यांनी रोहीत पवार यांना ‘भुरटं चॅलेंज देऊ नये, काय असेल तर थेट असे अव्हान देत, रोहीत पवार यांना आमदारकीचा राजीनामा देण्याचे खुले आव्हान यावेळी दिले.

राम शिंदे यांच्या दिवाळी फराळ कार्यक्रमाला तानाजी सावंत उपस्थित राहीले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, येत्या २०२४ ला हातात झाडू घेऊन हा मतदारसंघ आपल्याला साफ करायचा आहे, असे म्हणत आमदार रोहित पवार यांचं नाव न घेता तानाजी सावंत यांनी टीका केली.

हे सुद्धा वाचा :
एकनाथ शिंदे माझे मित्र…!, तर उद्धव ठाकरेंबाबत काय म्हणाले बच्चू कडू?

NCP Jayant Patil : मंत्रिमंडळ विस्तार न होण्याचे जयंत पाटील यांनी सांगितले कारण

Gujarat Assembly Election 2022 : ‘मोदी-शहां’चा गड पाडण्यासाठी काँग्रेसने कसली कंबर! गुजरात निवडणूकीसाठी आखली खास रणनिती

सन 2019 च्या विधानसभा निवडणूकीत रोहीत पवार यांनी आमदार राम शिंदे यांचा पराभव केला होता. त्यानंतर रोहीत पवार आणि राम शिंदे यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतात. रोहीत पवार यांनी कर्जत जामखेडमधून विधानसभेत एन्ट्री केल्यानंतर राम शिंदे यांना देखील त्यांच्या पक्षाने विधानपरिषदेवर संधी देत रोहीत पवार यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. त्यामुळे कर्जत जामखेडच्या राजकारणात नेहमीच आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडत असतो.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी