28.1 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमंत्रालयबाळासाहेब थोरातांचे सातारा जिल्हाधिकाऱ्यांना आदेश, नऊ कोरोनाबाधित प्रकरणाचा अहवाल पाठवा

बाळासाहेब थोरातांचे सातारा जिल्हाधिकाऱ्यांना आदेश, नऊ कोरोनाबाधित प्रकरणाचा अहवाल पाठवा

टीम लय भारी

मुंबई : ‘सातारा रूग्णालया’ने एका महिलेचा मृतदेह तिच्या नातलगांच्या ताब्यात दिला, अन् त्यामुळे नऊजणांना ‘कोरोना’चा संसर्ग झाला. यात रूग्णालयाबरोबरच प्रशासनाचाही हलगर्जीपणा पुढे आला ( Balasaheb Thorat sent a letter to Satara Collector ).

गेल्या आठवड्यात झालेल्या या प्रकरणाची महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना लेखी आदेश दिले आहेत, व या प्रकरणाचा अनुपालन अहवाल तात्काळ सादर करण्यास सांगितले आहे.

lay bhari
येथे क्लिक करा, व फेसबुक पेज लाईक करा

‘साताऱ्यातील त्या मृतदेहामुळे एकाच कुटुंबातील नऊ जणांना कोरोनाची लागण, प्रशासनाच्या बेफिकीरीचा परिणाम’ या मथळ्याखाली ‘लय भारी’ने बातमी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर स्थानिक महसूल अधिकाऱ्यांबद्दल लोकप्रतिनिधींनी महसूल मंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली असल्याचे थोरात यांच्या कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

खळबळजनक : शरद पवार, राजेश टोपे यांच्या दौऱ्याच्या तोंडावरच सातारा प्रशासनाकडून भयानक घोडचूक

राजेश टोपेंचे रात्रभर झाले जागरण, साताऱ्यातील दोन गंभीर घटना निस्तारण्यात गेला वेळ

‘सातारा हॉस्पीटल’वर मंत्रालयातून कारवाईचे आदेश

खळबळजनक :  साताऱ्यातील ‘त्या’ मृतदेहामुळे एकाच कुटुंबातील नऊ जणांना ‘कोरोना’ची लागण, प्रशासनाच्या बेफिकीरीचा परिणाम

Breaking : राजेश टोपे आक्रमक, प्रशासनाच्या बेफिकीरीमुळे 9 जणांना ‘कोरोना’ची लागण झाल्याप्रकरणी मागविला अहवाल

राजेश टोपे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, आयुक्तांवर नाराज

या बातमीच्या अनुषंगाने वस्तुस्थितीचा अहवाल विभागीय आयुक्तांमार्फत महसूल मंत्र्यांकडे तात्काळ सादर करण्यात यावा अशीही सूचना या पत्राद्वारे करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी हे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्याचे महसूल मंत्र्यांच्या कार्यालयातील सूत्रांनी ‘लय भारी’ला सांगितले.

Balasaheb Thorat sent a letter to collector
बाळासाहेब थोरातांनी सातारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आदेश

जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई गुलदस्त्यात

‘कोरोना’ची चाचणी झालेली असतानाही चाचणी अहवाल येण्याअगोदरच रूग्णालयाने नातलगांना मृतदेह दिला. यामध्ये रूग्णालयाने ‘कोविड’ प्रोटोकॉलचे पालन केले नसल्याचे दिसून आले आहे.

मृतदेहाचे दहन करताना घ्यावयाची काळजी याबाबत स्थानिक प्रशासनाने कुठलीही खबरदारी घेतली नाही. मृतदेहावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर दोन दिवसानंतर सदर मृत महिला ‘कोरोना’ पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. त्यानंतरही प्रशान ढिम्म होते.

‘लय भारी’ने बातमी प्रसिद्ध केल्यानंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रशासनाचे कान पिळले. त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले.

परंतु खासगी रूग्णालयावर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी काय कारवाई केली आहे, रूग्णालयाला साधी नोटीस तरी पाठविली आहे का याबाबत प्रसारमाध्यमांपासून माहिती लपविण्याचा केविलवाणा प्रयोग शेखर सिंह यांच्याकडून सुरू आहे. वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही, तसेच त्यांना एसएमएस पाठवूनही ते कोणताही प्रतिसाद देत नाहीत.

शेखर सिंह यांच्याकडून खासगी रूग्णालयाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न तर होत नाही ना असा सवाल आता उपस्थित झाला आहे.

Mahavikas Aghadi

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी