30 C
Mumbai
Wednesday, August 3, 2022
घरमंत्रालयEknath Shinde : न्यायालयीन सुनावणी उद्यावर, रविवारपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार

Eknath Shinde : न्यायालयीन सुनावणी उद्यावर, रविवारपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार

न्यायालयाची टांगती तलवार डोक्यावर असल्यामुळे एकनाथ शिंदे सरकारने मंत्रिमंडळाचा विस्तार सुद्धा केलेला नाही. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेवून एक महिना झाला. तरीही अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही.

एकनाथ शिंदे सरकारच्या भवितव्यावर सर्वोच्च न्यायालयात आजही फैसला होऊ शकला नाही. न्यायालयाने सुनावणी उद्या, गुरूवारपर्यंत लांबणीवर टाकली आहे. न्यायालयाचा अंतिम फैसला काय येणार हे अद्याप निश्चित नाही. परंतु मंत्रीमंडळाचा विस्तार मात्र रविवारपर्यंत होईल. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली आहे. मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चर्चा करीत आहेत. रविवारपर्यंत हा विस्तार होईल, अशी ठाम माहिती केसरकर यांनी दिली आहे.सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय लागेल हे निश्चित नसले तरी मंत्रिमंडळाचा विस्तार मात्र लवकरच होणार असल्याची ग्वाही दीपक केसरकर यांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा

Deepak Kesarkar : संत दीपक केसरकर ठाणे हृदयसम्राट एकनाथ शिंदेंना भेटले

Aaditya Thackeray यांच्या सभांमुळे शिंदे गटाच्या पायाखालची वाळू सरकली

अगला स्टेशन ‘ मातोश्री’…? असं कसं घडू शकतं ?

महाराष्ट्र विधिमंडळाच्या उपाध्यक्षांनी शिंदे गटाच्या १६ आमदारांचे सदस्यत्व रद्द केले आहे. सदस्यत्व रद्द करणे योग्य की अयोग्य, अल्पसंख्य आमदार असलेल्या पक्षाला प्रतोद नेमता येतो का, या पक्षाला व्हिप काढता येतो का, शिवसेना अधिकृतपणे उद्धव ठाकरे यांची की एकनाथ शिंदे गटाची, धनुष्यबाण चिन्ह कोण वापरू शकतो… असे अनेक पेच निर्माण झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या संभाव्य निकालानंतरच त्यावर तोडगा निघणार आहे. किंबहूना एकनाथ शिंदे सरकारचे भवितव्य सुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अवलंबून आहे.

न्यायालयाची टांगती तलवार डोक्यावर असल्यामुळे एकनाथ शिंदे सरकारने मंत्रिमंडळाचा विस्तार सुद्धा केलेला नाही. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेवून एक महिना झाला. तरीही अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही.

एकनाथ शिंदे सरकारचा सध्या लंगडा कारभार सुरू आहे. एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस असे दोनच मंत्री महिनाभरापासून कार्यरत आहेत. महाराष्ट्र सरकारचा अवाढव्य कारभार – कितीही क्षमता असली तरी दोन व्यक्ती सांभाळू शकत नाहीत. त्यामुळे विस्तार अपरिहार्य आहे. मंत्रीमंडळाचा विस्तार झाला तर काही कालावधीत सरकारचा कारभार वेगाने सुरू होईल. या पार्श्वभूमीवर केसरकर यांनी दिलासा देणारे विधान केले आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!