27 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमंत्रालयआयएएस एच एस सोनवणे यांची पुण्यात मुद्रांक शुल्क विभागात बदली

आयएएस एच एस सोनवणे यांची पुण्यात मुद्रांक शुल्क विभागात बदली

आयएएस एच एस सोनवणे यांची पुणे मुद्रांक शुल्क विभागात नोंदणी महानिरिक्षक व नियंत्रक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. आयएएस श्रावण हार्डिकर यांच्या जागेवर हे पद निवड श्रेणीत अवनत करुन सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने हे आदेश काढले असून सोनवणे यांना तातडीने पदाचा कार्यभार स्विकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आयएएस सोनवणे यांची डिसेंबर २०२२ मध्ये नाशिक आदिवासी विकास येथून मुंबई येथील दुग्धविकास नियुक्ती करण्यात आली होती. साधारण तीन महिन्यानंतर आता पुन्हा त्यांची मुंबईतून पुण्यात बदली करण्यात आली आहे. श्रावण हर्डीकर यांची फेब्रुवारी २०२१ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदावरुन मुद्रांक शुल्क विभागात नोंदणी महानिरिक्षक व नियंत्रक पदावर बदली करण्यात आली होती.

हे सुद्धा वाचा

कान्स चित्रपट महोत्सवासाठी ‘टेरिटरी’, ‘या गोष्टीला नाव नाही’ आणि ‘मदार’ चित्रपटांची निवड

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे भवितव्य अधांतरीच ! सुप्रीम कोर्टात आजही सुनावणी नाही

पवारांच्या वक्तव्यानंतर वंचितचा काँग्रेसच्या अदानीप्रकरणात जेपीसीच्या मागणीला पाठींबा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी