28 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमंत्रालयपत्रकार रफिक मुल्ला यांचा वाढदिवसाच्या पूर्वसंध्येलाच पुनर्जन्म !

पत्रकार रफिक मुल्ला यांचा वाढदिवसाच्या पूर्वसंध्येलाच पुनर्जन्म !

वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला मंत्रालयात असतानाच रफिक मुल्ला यांना हृदयविकाराचा झटका आला. अशा स्थितीत आरोग्यदूत असलेले सहकारी मंत्रालयीन पत्रकार दिपक कैतके यांच्या धावपळीमुळे वेळेवर जेजे रुग्णालयात दाखल होऊन डॉ. कल्याण मुंडे यांच्याकडून योग्य उपचार मिळाल्याने रफिक मुल्ला यांना जीवदान मिळू शकले.

ज्येष्ठ पत्रकार रफिक मुल्ला यांचा वाढदिवसाच्या पूर्वसंध्येलाच पुनर्जन्म झाला आहे. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला मंत्रालयात असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. अशा स्थितीत आरोग्यदूत असलेले सहकारी मंत्रालयीन पत्रकार दिपक कैतके यांच्या धावपळीमुळे वेळेवर जेजे रुग्णालयात दाखल होऊन डॉ. कल्याण मुंडे यांच्याकडून योग्य उपचार मिळाल्याने रफिक मुल्ला यांना जीवदान मिळू शकले.

सध्या स्वतंत्र पत्रकार, राजकीय विश्लेषक राहिलेले रफीक मुल्ला यांनी यापूर्वी ‘न्यूज-18 लोकमत’चे राजकीय संपादक म्हणून काम पाहिले आहे. याशिवाय, न्यूज नेशन, झी नेटवर्क, ईटीव्ही, चित्रलेखा, तरुण भारत, सकाळ समूहात त्यांनी काम केलेले आहे. मंत्रालयात तसेच राजकीय पत्रकार म्हणून काम करतांना त्यांनी स्वत:ची एक वेगळी छाप उमटवलेली आहे. ते मूळचे सातारा जिल्ह्यातील खटाव येथील आहेत.

 

पत्रकार रफिक मुल्ला यांचा वाढदिवस 26 मे रोजी असतो. तत्पूर्वीच, आदल्या दिवशी, 25 मे रोजी ते नेहमीप्रमाणे मंत्रालय पत्रकार कक्षात कार्यरत होते. काम करतानाच संध्याकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. हा झटका अतिशय तीव्र स्वरूपाचा होता. यावेळी तिथे उपस्थित असलेले आरोग्यदूत पत्रकार दिपक कैतके यांना हृदयविकाराच्या धक्क्याची लक्षणे लगेच लक्षात आली. कैतके यांनी क्षणाचाही विलंब न लावता, तिथे उपस्थित पत्रकारांच्या मदतीने खासगी वाहनाने रफिक मुल्ला यांना जेजे रुग्णालयात नेले. तिथे त्यांना तात्काळ दाखल करवून घेण्याची व्यवस्था कैतके यांनी मंत्रालयातून निघताना वाटेतच संबंधितांशी फोनाफोनी करून मार्गी लावली होती. ज्येष्ठ पत्रकार राजा आदाटे तिथे व्हील चेअर व संबंधित कर्मचाऱ्यांसह आधीच उपस्थित होते.

डॉ कल्याण मुंडे विभागप्रमुख Dr. Kalyan Munde Sir JJ Hospital Mumbai
डॉ. कल्याण मुंडे, विभागप्रमुख

जेजे रुग्णालयातील डॉक्टर्स आणि स्टाफने रफिक मुल्ला यांना तात्काळ दाखल करून घेत प्रथमोपचार दिले. तत्पूर्वी, प्राथमिक सर्व आरोग्यविषयक माहिती असलेल्या आरोग्यदूत दिपक कैतके यांनी अत्यवस्थ असलेले रफिक मुल्ला यांना व्यवस्थित झोपवून हाताने छातीवर विशिष्ठ पद्धतीने दाब देऊन सीपीआर प्रथमोपचार दिला होता. पुढील उपचारासाठी खासगी वाहनातून त्यांना जेजे रुग्णालयात नेण्यात आले. साधारणत: सायंकाळी चार वाजता डीन कार्यालयापाशी पोहोचताच रुग्णाला तातडीने चौथ्या मजल्यावर नेले गेले. उपचार सुरू होण्यापूर्वीच्या कालावधीत ‘जेजे’तील डॉक्टर्स आणि स्टाफने सीपीआर देणे सुरूच ठेवल्याने याचा लाभ रुग्णाला पुरेपूर झाला.

जेजे रुग्णालयात रफिक मुल्ला यांची तात्काळ अॅंजिओग्राफी केली गेली. मेजर ब्लॉकेज आढळल्याने त्यांच्यावर अॅंजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करून हृदयातील ब्लॉकेज तात्काळ काढून टाकण्यात आले व उत्तम प्रतीचा स्टेंटही टाकण्यात आला. कुठलाही वेळ न घालवता अतिशय जलद गतीने ही सगळी प्रक्रिया पार पडली. सायंकाळी 4 वाजता दाखल रुग्णावर अवघ्या तासाभरात अॅंजिओग्राफी व  अॅंजिओप्लास्टी शस्त्रक्रिया केली गेली. अगदी विक्रमी वेळेत, योग्य उपचार मिळून पत्रकार रफिक मुल्ला यांना जीवदान मिळू शकले. यात जेजे रुग्णालय डॉक्टर्स आणि स्टाफबरोबरच आरोग्यदूत दिपक कैतके यांचीही भूमिका महत्त्वाची ठरली. मुल्ला यांना आलेल्या हृदयविकार झटक्याची लक्षणे ओळखण्यात व त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात जराही वेळ झाला असता तरी हा झटका त्यांच्या जीवावर बेतण्याची शक्यता होती.

ऑन ड्युटी डॉ. कल्याण मुंडे आणि सहकारी स्टाफने शस्त्रक्रिया पार पाडली. या हृदय शस्त्रक्रियेनंतर आता रफिक मुल्ला यांची प्रकृती स्थिर व उत्तम आहे. त्यांना हृदय अतिदक्षता विभागात (ICCU) निगराणीत ठेवण्यात आले आहे. कुटुंब आणि मित्रपरिवार त्यांच्या सोबत आहेत.

कार्डियाक कॅथलॅबलचे भिजत घोंगडे 
मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जे. जे. रुग्णालयासाठी आवश्यक साधनसुविधाबाबत माहिती जाणून घेतली होती. जे. जे. रुग्णालयात कार्डिओलॉजी विभाग, नवीन कॅथलॅब व आवश्यक मुलभूत सुविधांसह कायापालट करण्याची घोषणा केसरकर यांनी केली होती.
मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जे. जे. रुग्णालयासाठी आवश्यक साधनसुविधाबाबत माहिती जाणून घेतली होती. जे. जे. रुग्णालयात कार्डिओलॉजी विभाग, नवीन कॅथलॅब व आवश्यक मुलभूत सुविधांसह कायापालट करण्याची घोषणा केसरकर यांनी केली होती. (फोटो क्रेडिट : गुगल)

जिल्हा नियोजन समिती (डीपीडीसी) व राज्य शासनाच्या वतीने जेजे रुग्णालयासाठी दोन कार्डियाक कॅथलॅब मंजूर करून निधीचीही तरतूद करण्यात आली आहे. निधी मंजूर असूनही कार्डियाक कॅथलॅबचे भिजत घोंगडे पडून आहे. हाफकीन इन्स्टिट्यूटमुळे यात विलंब होत असल्याचे समजते. जे. जे. रुग्णालयात रुग्णांना आवश्यक असणाऱ्या अद्ययावत सुविधा तातडीने उपलब्ध करुन देण्यात येण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची घोषणा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली होती. वर्षभरात जेजे कार्डियाक विभागात सुमारे पाच हजार शस्त्रक्रिया होतात. मशीनरी जुनाट झाल्याने अनेकदा समस्या उद्भवतात. सुदैवाने, रफिक मुल्ला यांच्या शस्त्रक्रियेच्या वेळी कॅथलॅबमध्ये कोणतीही अडचण आली नाही. अॅंजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यासाठी कॅथलॅब आवश्यक असते. 

 

हृदयविकाराच्या झटक्यानंतर पहिल्या एक दोन तासांत तात्काळ व योग्य उपचार मिळाल्यानेच जगभरात अधिक मृत्यू होत असतंत. त्यात चुकीचा सल्ला देणारे शेजारी-पाजारी असतात. हृदयविकाराचा झटका आल्यास सबंधित व्यक्तीला त्वरित हॉस्पिटलमध्ये नेणे व त्या दरम्यान प्रथमोपचार मिळणे, हे अतिशय महत्त्वाचे ठरते. त्यामुळे सुमारे 60 टक्के पेशंटचे प्राण वाचू शकतात. सुरुवातीच्या 30 ते 90 मिनिटात उपचार न मिळाल्यास पेशंटचे खूप नुकसान होते. सुदैवाने, ज्येष्ठ पत्रकार रफिक मुल्ला यांना मंत्रालय पत्रकार कक्षात असतानाच त्रास झाला. आजूबाजूला आरोग्यदूत दिपक कैतके यांच्यासारखे माहितगार असल्याने त्यांनी लक्षणे ओळखून तात्काळ प्राथमिक उपचार सुरू करून रुग्णालयात हलविले. यामुळे वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला जणू रफिक मुल्ला यांचा पुनर्जन्म झाला आहे. आरोग्यदूत पत्रकार दिपक कैतके यांची समयसूचकता आणि तात्काळ योग्य निर्णय घेतल्याने हे शक्य होऊ शकले. डॉ. कल्याण मुंडे आणि जेजेतील त्यांचा सहकारी स्टाफनेही वेळ न घालवता मेहनत घेऊन मुल्ला यांचे प्राण वाचविले.

 

हे सुद्धा  वाचा : 

टॅव्‍ही’ हृदय शस्त्रक्रियेतून शेकडो रुग्णांना जीवदान देणारे डॉ. अनमोल सोनावणे यूथ आयकॉन पुरस्काराने सन्मानित

Covid : कोरोनामुळे रुग्णाच्या हृदयाची स्थिती बिघडू शकते, अभ्यासात धक्कादायक खुलासा

World Health Day : हृदय निरोगी ठेवायचे असेल तर या गोष्टी नक्की करा

पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना माण परिसरातील दुष्काळजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन कर्तृत्त्ववान माणदेशी लोकांचा सत्कार करण्यात आला होता. त्यात रफिक मुल्ला यांचाही समावेश होता. तालुक्यातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी सातत्याने विधायक सहकार्य करून माध्यमातून बाजू मांडली आहे. अलीकडेच साता-यातली प्राचीन वृक्ष संपदा वाचवण्यासाठी वृक्षप्रेमींनी उभारलेल्या संघर्षातही रफिक मुल्ला यांनी सहभाग घेतला होता. शेकडो झाडे तोडून झालेले भकास महामार्ग नकोसे वाटतात. त्यामुळे नव्या मार्गावरील झाडे तोडू न देण्याचा निर्धार करून वृक्षप्रेमींनी खटावमध्ये लढा उभारला होता.

Journalist Rafiq Mulla ReBorn, ArogyDoot Dipak Kaitke Assisted, Rafiq Mulla BirthDay, Dr Kalyan Munde, Mantralay Press Room

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी