29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमंत्रालयExclusive : मंगलप्रभात लोढा परदेशी अधिकाऱ्याला म्हणाले; तुम्हाला शिवाजी महाराज, डॉ. आंबेडकर...

Exclusive : मंगलप्रभात लोढा परदेशी अधिकाऱ्याला म्हणाले; तुम्हाला शिवाजी महाराज, डॉ. आंबेडकर माहित आहेत का ?

मंगलप्रभात लोढा यांची एक कौतुकास्पद बाजू ‘लय भारी’च्या हाती आली आहे. लोढा यांनी केलेले वादग्रस्त वक्तव्य बुधवारचे होते. परंतु त्यांची कौतुकास्पद बाब ही त्या अगोदरचीच आहे. सूत्रांनी ही माहिती ‘लय भारी’ला आठवड्यापूर्वीच दिली होती. सध्याच्या वादग्रस्त विधानाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कौतुकास्पद कृतीचीही दखल घ्यायला हवी.

मंगलप्रभात लोढा सध्या चांगलेच वादात सापडले आहेत. लोढा यांनी शिवाजी महाराजांची तुलना एकनाथ शिंदेंच्या बंडासोबत केली. ही तुलना महाराष्ट्रीय जनतेला बिल्कूल आवडली नाही. त्यामुळे लोढा यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. परंतु लोढा यांची एक कौतुकास्पद बाजू सुद्धा ‘लय भारी’च्या हाती आली आहे. लोढा यांनी केलेले वादग्रस्त वक्तव्य बुधवारचे होते. परंतु त्यांची कौतुकास्पद बाब ही त्या अगोदरचीच आहे. सूत्रांनी ही माहिती ‘लय भारी’ला आठवड्यापूर्वीच दिली होती. सध्याच्या वादग्रस्त विधानाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कौतुकास्पद कृतीचीही दखल घ्यायला हवी.

आठवडापूर्वी एक परदेशी अधिकारी लोढा यांना भेटण्यासाठी मुंबईत आला होता. हा अधिकारी दिल्लीच्या दुतावासात काम करतो. मुंबईत हा अधिकारी आपल्या सरकारी कामासाठी लोढा यांच्याकडे भेटण्यासाठी आला होता. लोढा यांनी या अधिकाऱ्याला पहिला प्रश्न विचारला. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज माहित आहेत का ?.  अधिकाऱ्याने ‘नो’ म्हणून सांगितले. लोढा यांनी या अधिकाऱ्याला दुसरा प्रश्न विचारला. तुम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर माहित आहेत का ? त्यावर सुद्धा या अधिकाऱ्याने ‘नो’ असेच उत्तर दिले.

हे सुद्धा वाचा

मंगलप्रभात लोढा यांचा पुढाकार, महारोजगार मेळाव्यातून देणार हजारो रोजगार !

मेलो असतो तर बरं झालं असतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानामुळे उदयनराजे भावुक

VIDEO : छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार परत आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील

अधिकाऱ्याच्या अज्ञानावर लोढा यांनी नाराजीवजा आश्चर्य व्यक्त केले. फार मोठ्या व्यक्तींविषयी आपल्याला काहीच ‘अक्कल’ नसल्याचे या परदेशी अधिकाऱ्याच्याही लक्षात आले.

लोढा यांनी आपल्या खात्यातील काही अधिकाऱ्यांना सुचना केली. छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनावरील दोन पुस्तके विकत आणण्यास सांगितले. ‘लय भारी’ला मिळालेल्या माहितीनुसार लोढा यांच्या कार्यालयात शिवाजी सावंत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर लिहिलेल्या कादंबरीचे इंग्रजी अनुवादित पुस्तक पोहचले होते.

हे पुस्तक आतापर्यंत संबंधित परदेशी अधिकाऱ्याला भेट म्हणून दिले असेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले कार्य अतुलनीय आहे. भारतात येणाऱ्या परदेशी व्यक्तीला सुद्धा हे कार्य समजले पाहीजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाची राज्य घटना लिहिली आहे. डॉ. आंबेडकर यांचे कार्य उदात्त आहे. हे दोन्ही महापुरूष परदेशी लोकांना माहित असायला हवेत, अशी प्रामाणिक भावना मंगलप्रभात लोढा यांची होती. त्या भावनेतूनच लोढा यांनी परदेशी अधिकाऱ्याला छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माहिती विचारल्याचे सूत्रांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी