28 C
Mumbai
Friday, August 5, 2022
घरमंत्रालयMantralaya : मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याचा ‘शहाणपणा’, बदलीसाठी इतर अधिकाऱ्यांना तीन वर्षांचा नियम,...

Mantralaya : मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याचा ‘शहाणपणा’, बदलीसाठी इतर अधिकाऱ्यांना तीन वर्षांचा नियम, स्वतः मात्र आठ वर्षापासून एकाच ठिकाणी कायम

सरकारी अधिकाऱ्याची तीन वर्षांत बदली झाली पाहीजे, असा नियम आहे. या नियमाची कडक अंमलबजावणी व्हावी म्हणून मंत्रालयातील एक अधिकारी हातात दंडूका घेऊन बसलेला आहे. हा दंडुकाधारी अधिकारी राज्यभरातील सगळ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या वेळेत होतील, याची काळजी घेत असतो. परंतु स्वतः मात्र आठ वर्षापासून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेला आहे. गेल्या वर्षी या अधिकाऱ्याने मुदतवाढ मिळवून घेतली होती. यंदाही त्याला परत मुदतवाढ हवी आहे. माधव वीर असे या अधिकारी महोदयांचे नाव आहे. मंत्रालयात महसूल विभागाचे ते सहसचिव आहेत.
वास्तवात माधव वीर यांनी महसूल विभागात दोन पदांवर काम केलेले आहे. त्यामुळे सहा वर्षानंतर महसूल विभागातून त्यांची बदली व्हायला हवी होती. पण ते या खात्यात ठाण मांडून बसले आहेत. राज्यातील तहसिलदार, प्रांत, उप जिल्हाधिकारी व अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या अस्थापना वीर यांच्या कार्यकक्षेत येतात. क्षेत्रीय स्तरावरील या अधिकाऱ्यांच्या चौकशा, त्यांच्या सेवापुस्तिका इत्यादी इंगीते वीर यांच्याकडे असतात. त्यामुळे राज्यभरातील या शेकडो अधिकाऱ्यांच्या मानगुठीवर बसण्याची संधी वीर यांना मिळते.

हे सुद्धा वाचा

Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांनी केल्या ८ अधिकाऱ्यांच्या बदल्या

सरकार अस्थिर, बदल्यांसाठी ‘किंमत’ मोजलेले अधिकारी हवालदिल

मंत्रालयात बदल्या, जमिनींच्या व्यवहारात करोडोंची उलाढाल
अधिकाऱ्यांची बदली, पदोन्नती, चौकशी, निलंबन अशा प्रकारची जबाबदारी वीर यांच्याकडे आहे. या मोठ्या जबाबदारीमुळे आडले नडलेले अधिकारी काकुळतीला येवून वीर यांना भेटत असतात. अशा भेटी गाठी घ्यायला वीर यांनाही आवडते. त्यामुळे ते खूर्ची सोडायला तयार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
वास्तवात, गेल्या वर्षी काही अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे प्रकरण न्यायालयात होते. हे प्रकरण कायदेशीरदृष्ट्या व्यवस्थित हाताळण्यासाठी वीर यांची बदली थांबविण्यात आली होती. परंतु हे प्रकरण वीर यांना नीट हाताळता आले नाही. या प्रकरणी न्यायालयाचा निकाल सरकारच्या विरोधात गेला होता.
यंदाही थातूर मातूर कारण देवून वीर यांनी याच पदावर कायम राहण्यासाठी लॉबिंग केले असल्याचे सूत्रांनी ‘लय भारी’शी बोलताना सांगितले. इतर अधिकाऱ्यांना जो नियम लावला जातो, तोच नियम माधव वीर यांनाही लावावा, अशी भावना अन्य अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!