30 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरमंत्रालयEknath Shinde : एकनाथ शिंदे यांनी केल्या ८ अधिकाऱ्यांच्या बदल्या

Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांनी केल्या ८ अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्यातील आठ अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. तरूणकुमार खत्री, वर्षा उंटवाल – लड्डा, रवि जनार्दन पाटील, दीपक क्षीरसागर, रेश्मा राजेश माळी, पंकज संतोष देवरे, विकास मारूती पानसरे, मनिषा जायभाये अशी बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्यातील आठ अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. तरूणकुमार खत्री, वर्षा उंटवाल – लड्डा, रवि जनार्दन पाटील, दीपक क्षीरसागर, रेश्मा राजेश माळी, पंकज संतोष देवरे, विकास मारूती पानसरे, मनिषा जायभाये अशी बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. महसूल विभागाने काल रात्री उशिरा बदलीचे आदेश जारी केले आहेत. प्रांतधिकारी, उपजिल्हाधिकारी असे अनेकजण बदलीच्या प्रतिक्षेत आहेत. परंतु सरकार बदलल्यामुळे अधिकाऱ्यांच्या बदल्यांना कोलदांडा बसला होता. एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळाने आठ अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामुळे इतर बदल्यांनाही चालना मिळेल, अशी भावना अधिकारी वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

तरूणकुमार खत्री हे तत्कालिन अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या कार्यालयात ओएसडी म्हणून कार्यरत होते. आता त्यांची नियुक्ती सिडकोमध्ये अपर जिल्हाधिकारी या पदावर झाली आहे. वर्षा उंटवाल या महाराष्ट्र राज्य शेती महामंडळात मुख्य कार्यकारी (प्रशासन) या पदावर कार्यरत होत्या. आता त्यांची नियुक्ती पुणे विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात उपायुक्त (सामान्य) या पदावर करण्यात आली आहे.

रवि जनार्दन पाटील हे महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. आता त्यांची नियुक्ती कोकण विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात उपायुक्त (पुरवठा) या पदावर करण्यात आली आहे. दीपक क्षीरसागर हे नियुक्तीच्या प्रतिक्षेत होते. त्यांना चिमूर (चंद्रपूर) येथे अपर जिल्हाधिकारी या पदावर नियुक्ती देण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

Eknath Shinde Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्ताराची लगीनघाई सुरू

Eknath Shinde : मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून निर्णय घेण्याचा वेग कायम

Eknath Shinde : न्यायालयीन सुनावणी उद्यावर, रविवारपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार

रेश्मा राजेश माळी या नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात कार्यरत होत्या. आता त्यांची नियुक्ती महाऊर्जाच्या प्रादेशिक संचालक या पदावर करण्यात आली आहे. पंकज संतोष देवरे हे कोकण विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात कार्यरत होते. आता त्यांची नियुक्ती मुंबई उपनगरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी (अतिक्रमण व निष्कासन) या पदावर करण्यात आली आहे.
विकास मारूती पानसरे नियुक्तीच्या प्रतिक्षेत होते. त्यांची बदली आता अहमदनगर येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे. मनिषा कृष्णराव जायभाये या नियुक्तीच्या प्रतिक्षेत होत्या. त्यांची नियुक्ती आता ठाण्याच्या अपर जिल्हाधिकारी या पदावर करण्यात आली आहे.

क्रिम पदावर नियुक्ती व्हावी म्हणून अधिकारी आकाशपाताळ एक करीत असतात. त्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजायला तयार असतात. त्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे व पुण्यात बदली झालेल्या अधिकाऱ्यांचे नशीब फळफळले असल्याचे बोलले जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी