31 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeमंत्रालयरविवारपासून सलून, ब्युटी पार्लर, स्पा सुरू करण्यास सरकारची परवानगी, पण सलून चालकांमध्ये...

रविवारपासून सलून, ब्युटी पार्लर, स्पा सुरू करण्यास सरकारची परवानगी, पण सलून चालकांमध्ये नाराजी

टीम लय भारी

मुंबई : सलून व्यावसायिक व सामान्य जनतेला दिलासा देणारा महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे ( Mission Begin again ). येत्या २८ जूनपासून ( रविवार ) राज्यात सलून, ब्युटी पार्लर, स्पा सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. याबाबतचा आदेश मावळते मुख्य सचिव अजोय मेहता यांनी सायंकाळी उशिरा जारी केला आहे ( Saloons will restart from Sunday ).

केश कर्तनालये सुरू करण्यासाठी सरकारने परवानगी दिली आहे. पण आम्ही केलेल्या मागण्यांची सरकारने दखल घेतलेली नाही, अशी नाराजी सलून व्यावसायिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे ( Saloon owners upset on govt’s decision )

‘लॉकडाऊन’मुळे गेली तीन महिने सरकारने दुकाने बंद केली होती. या तीन महिन्यांत आमच्या व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे किमान दुकानांचे भाडे व वीज बिल यासाठी तरी अनुदान द्यायला हवे होते. विमा संरक्षण द्यायला हवे होते. व्यवसाय बंद झाल्यामुळे सात जणांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांच्या कुटुंबियांचीही सरकारने दखल घेतलेली नाही. आता व्यवसाय सुरू करताना नियम व अटी खूप लागू केल्या आहेत. त्याची पूर्तता करण्यासाठी मोठा खर्च येणार आहे. हा खर्च कसा उभा करायचा याचीही चिंता आहे. – विशाल पवार, सातारा जिल्हाध्यक्ष, जिवा सेना

केश कर्तनालय सुरू करण्यास अटी व शर्ती

सलून, ब्युटी पार्लर व स्पा सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली असली तरी त्यासाठी काही अटीही लागू करण्यात आल्या आहेत ( Maharashtra Government allowed saloons,beauty parlor and spa with some terms and conditions ).

केस कापणे, केसांना डायिंग करणे, वॅक्सिंग करणे, केसांवर प्रक्रिया करणे या बाबी सलून व्यावसायिकांना करता येतील. परंतु त्वचेशी निगडीत कोणतीही कामे करता येणार नाहीत. ग्राहकांनी सलून व्यावसायकांची आगाऊ वेळ ( अपॉईन्मेट ) घेऊनच केस कापण्यासाठी जावे.

Mission Begin again for saloons Mission Begin again for saloons

रविवारपासून सलून, ब्युटी पार्लर, स्पा सुरू करण्यास सरकारची परवानगी, पण सलून चालकांमध्ये नाराजी

सलून व्यावसायिकांनी हातमोजे, ॲपरन, मास्क अशा सुरक्षा साहित्यांचा वापर करणे बंधनकारक आहे. प्रत्येक ग्राहकानंतर खूर्ची सॅनिटाईज करणे बंधनकारक आहे. फरशी व दुकानांच्या आतील परिसर दर दोन तासांनी सॅनिटाईज करणे आवश्यक आहे.

Mahavikas Aghadi

हे सुद्धा वाचा

मुख्य सचिव पदावर संजयकुमार यांची नियुक्ती, अजोय मेहता मुख्यमंत्री कार्यालयात

MNS scathing attack on Uddhav Thackeray  : मनसेची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका, मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्ह ‘इंग्रजी’तच करावे !

एकदाच वापरून नंतर टाकता येतील असे टॉवेल व रूमालांचा उपयोग करावा. पुनर्वापर करणारे टॉवेल व रुमालांचा उपयोग केल्यास ते प्रत्येक ग्राहकानंतर सॅनिटाईज करणे बंधनकारक आहेत. प्रत्येक दुकानदारांनी दुकानात ग्राहकांसाठी सूचना लावणे बंधनकारक आहे. अशा सुचना अजोय मेहता यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद केल्या आहेत ( Ajoy Mehta issued order for saloon, beauty parlor and spa ).

व्यावसायिक, सामान्य लोकांना दिलासा

गेली तीन महिने व्यवसाय बंद असल्याने राज्यभरातील सलून व्यावसायकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. सामान्य लोकांनाही केस कापण्याची सुविधा उपलब्ध नव्हती. राज्य सरकारच्या या नव्या निर्णयामुळे ( Mission begin again ) सलून व्यावसायिक व सामान्य जनतेला दिलासा मिळेल.

Moneyspring

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी