33 C
Mumbai
Tuesday, March 19, 2024
Homeमंत्रालयShivsena : सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेमुळे एकनाथ शिंदेंची तिहेरी कोंडी, उद्धव ठाकरेंसाठी मात्र...

Shivsena : सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेमुळे एकनाथ शिंदेंची तिहेरी कोंडी, उद्धव ठाकरेंसाठी मात्र आशेचा किरण

न्यायालयाची ही सुनावणी मात्र उद्धव ठाकरे यांच्यासाठी आशेचा किरण ठरताना दिसत आहे. मूळ पक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे महत्व अबाधित राहू शकते, ही सर्वात मोठी शक्यता निर्माण झाली आहे.

शिवसेना कुणाची (Shivsena) या मुद्द्याच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीत अंतिम निर्णय आलेला नाही. न्यायालयाने पुढील सुनावणी सोमवारी घेणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाच्या आस्तित्वावर असलेली अस्थिरतेची टांगती तलवार कायम आहे. दुसऱ्या बाजूला न्यायालयाने निवडणूक आयोगाला पक्षाच्या चिन्हाबाबत कोणताही निर्णय घेण्यास मज्जाव केला आहे. या प्रकरणासाठी स्वतंत्र घटनापीठाची नियुक्ती करायची का, याबाबतही सोमवारी निर्णय घेतला जाईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयासमोर शिंदे गटाच्या वतीने हरीष साळवे, उद्धव ठाकरे यांच्या वतीने कपिल सिब्बल, तर निवडणूक आयोगाच्या वतीने अरविंद दातार या वकिलांनी आपली बाजू मांडली.

हे सुद्धा वाचा

Eknath Shinde : न्यायालयीन सुनावणी उद्यावर, रविवारपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार

उद्धव ठाकरे घुसले एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात, ठाणेकरांकडून जबरदस्त प्रतिसाद

Aaditya Thackeray यांच्या सभांमुळे शिंदे गटाच्या पायाखालची वाळू सरकली

‘मूळ पक्षाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही’ अशी अतिशय महत्वपूर्ण टिप्पणी न्यायालयाने केली आहे. ही टिप्पणी उद्धव ठाकरे यांच्यासाठी फायद्याची, तर शिंदे गटासाठी डोकेदुखी आहे. न्यायालयाकडून कोणत्याच बाबतीत एकनाथ शिंदे गटाला दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे शिंदे गटाची तिहेरी कोंडी झाली आहे. अंतिम निर्णय आलेला नसल्यामुळे मंत्रीमंडळाचा विस्तार नाईलाजाने करावा लागेल. अन्यथा जनभावना शिंदे गटाविरोधात वाढत जाईल. आता मंत्रीमंडळ विस्तार केला, अन् भविष्यात न्यायालयाचा निकाल विरोधात गेला तर मोठी पंचाईत होईल. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी अवस्था एकनाथ शिंदे यांची झाली आहे.

मूळ पक्षाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. या मुद्दा प्रमाण माणून न्यायालयाने भविष्यातील निर्णय दिला तर, शिवसेनेला हायजॅक करण्याचा एकनाथ शिंदे यांचा डाव फसू शकतो. तिसऱ्या बाजूला न्यायालयाने निवडणूक आयोगालाही कोणताही निर्णय घेण्यास मज्जाव केलेला आहे. या तिन्ही बाबी एकनाथ शिंदे यांच्यासाठी चिंतेच्या आहेत.

उद्धव ठाकरे यांचा मूळ पक्ष शाबूत राहिला तर एकनाथ शिंदेंच्या बंडासमोर कायदेशीर पेच वाढतील. आम्ही शिवसेनेतेच आहोत हा शिंदे गटाचा दावा निष्फळ ठरेल.

न्यायालयाची ही सुनावणी मात्र उद्धव ठाकरे यांच्यासाठी आशेचा किरण ठरताना दिसत आहे. मूळ पक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे महत्व अबाधित राहू शकते, ही सर्वात मोठी शक्यता निर्माण झाली आहे.

निवडणूक आयोगाने गेल्या काही वर्षांत भाजपचे मांडलिकत्व पत्करलेले आहे. पण निवडणूक आयोगाला या प्रकरणात कोणताच निर्णय घेण्यास न्यायालयाने मज्जाव केला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून हवे तसे करून घेण्याची संधी भाजप व शिंदे गटाला राहिलेली नाही. परिणामी विद्यमान सुनावणी ही उद्धव ठाकरे यांच्या फायद्याची तर एकनाथ शिंदे यांच्यासाठी डोकेदुखी ठरली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी