32 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
Homeमंत्रालयIPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या धामधूमीतही शिंदे-फडवणवीस सरकारचा झपाटा सुरुच

IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या धामधूमीतही शिंदे-फडवणवीस सरकारचा झपाटा सुरुच

शिंदे-फडणवीस सरकारचा  (Shinde-Fadnavis government) वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा झपाटा सुरुच असून ऐन अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या धामधूमीत मंगळवारी (दि.28) रोजी राज्यातील IPS तसेत राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या (Transfers of IPS Officers) केल्या आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून  पदस्थापनेच्या प्रतिक्षेत असलेल्या आयपीएस अधिकाऱ्यांना  गृहविभागाने आज जीआर काढून पदस्थापना दिली आहे. यामध्ये बिपिन कुमार सिंह, प्रभात कुमार, विनित अगरवाल, राजकुमार व्हटकर, जय वसंतराव जाधव, कैसर खालीद, डी.के. पाटील-भुजबळ, एस.एच. महानवर, नीवा जैन तसेच राज्य पोलीस सेवेतील अभिजीत सुरेश शिवथरे, पौर्णिमा चौगुले -श्रींगी, राहुल डी. खाडे यांच्या बदल्या केल्या आहेत. (Transfers of IPS Officers; Even in the hustle and bustle of the budget session, the momentum of the Shinde-Fadnavis government continues)

पदस्थापनेच्या प्रतिक्षेत असलेल्या आयपीएस आधिकाऱ्यांचे पोस्टींग 

पदस्थापनेच्या प्रतिक्षेत असलेले आयपीएस अधिकारी बिपिन कुमार सिंह यांना मुंबईत राज्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अपर पोलीस महासंचालकपदी पदस्थापना देण्यात आली आहे. पदस्थापनेच्या प्रतिक्षेत असलेले प्रभात कुमार यांना मुंबईत राज्य होमगार्डच्या अपर पोलीस महासंचालक व उप महासमादेशकपदी पदस्थापना देण्यात आली आहे. पदस्थापनेच्या प्रतिक्षेत असलेले राजकुमार व्हटकर यांची मुंबईत राज्याच्या प्रशिक्षण व खास पथके विभागात विशेष पोलीस महानिरीक्षकपदी पदस्थापना देण्यात आली आहे. पदस्थापनेच्या प्रतिक्षेत असलेले जय वसंतराव जाधव यांची मुंबईत महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगात विशेष पोलीस महानिरीक्षकपदी पदस्थापना देण्यात आली आहे. पदस्थापनेच्या प्रतिक्षेत असलेले कैसर खालीद यांना पुणे येथे मोटार परिवहन विभागात विशेष पोलीस महानिरीक्षकपदी पदस्थापना देण्यात आली आहे. पदस्थापनेच्या प्रतिक्षेत असलेले एस. एच. महानवर नांदेड परिक्षेत्राच्या पोलीस उप महानिरीक्षकपदी पदस्थापना देण्यात आली आहे.

IPS नीवा जैन प्रतिनियुक्तीवर दिल्लीत

नागपूर शहराच्या अपर पोलीस आयुक्त नीवा जैन यांची प्रतिनियुक्तीने बदली करण्यात आली आहे. जैन यांना दोन वर्षांच्या प्रतिनियुक्तीने दिल्ली येथे बदली करण्यात आली आहे. नीवा जैन या नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या अपर निवासी आयुक्त, सचिव व निवासी आयुक्त म्हणून दिल्लीत जाणार आहेत.

राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसोबतच काही राज्य पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखील बदल्या आज करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये अभिजीत सुरेश शिवथरे, पौर्णिमा चौगुले -श्रींगी, राहुल डी. खाडे यांचा समावेश आहे. सध्या पदस्थापनेच्या प्रतिक्षेत असलेले अभिजीत सुरेश शिवथरे यांना मुंबईत कायदा व सुव्यवस्था पोलीस महासंचालक कार्यालयात सहायक पोलीस महानिरीक्षकपदी बदलीने पदस्थापना देण्यात आली आहे. तर नाशिक शहरच्या पोलीस उप आयुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांची बदली मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयात पोलीस उप आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तर 7 नोव्हेंबर 2022 च्या शासन आदेशात सुधारणा करत अमरावती गुन्हे अन्वेशन विभागाचे पोलीस अधिक्षक राहूल डी. खाडे यांची जालना अपर पोलीस अधिक्षकपदी बदली करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्र राज्य कुष्ठरोग मुक्त करणार; आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची घोषणा

Gautami Patil : नृत्यांगना गौतमी पाटीलच्या समर्थनार्थ हभप शुभम महाराज माने; व्हिडीओप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी

TAIT Exam : विवाहित महिला उमेदवाराला परीक्षेपासून ठेवले वंचित; राज्य सरकार आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी