टीम लय भारी
मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. युवासेना नेते वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वात राणेंच्या मुंबईतील घरावर काढलेल्या मोर्चात शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली आहे. ‘कोरोना हृदय सम्राट’ गप्प का?, असा सवाल मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे (MNS has questioned Chief Minister Uddhav Thackeray).
सकाळपासून सुरु असलेल्या वादावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील भाष्य केलं आहे. आज सकाळपासून महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था फाट्यावर मारून आंदोलन आणि गर्दी जमवली जात आहे. कुठेही सोशल डिस्टनसिंग नाही, गर्दी च गर्दी अस असून ‘कोरोना हृदय सम्राट’ गप्प का?आणि हो सोशल डिस्टनसिंगचा फज्जा म्हणणारे पत्रकार आज तो शब्द विसरून हा आक्रमक तो आक्रमक म्हणतायत, असे म्हणत संदीप देशपांडे यांनी संताप व्यक्त केला आहे (MNS leader Sandeep Deshpande has expressed anger).
मनसेचा उद्धव ठाकरेंवर पुन्हा निशाणा, पण टास्क फोर्सच्या खांद्यावर बंदूक ठेवून
मनसेने मानले मुख्यमंत्र्यांचे आभार!
आज सकाळ पासून महाराष्ट्रा मध्ये कायदा सुव्यवस्था “फाट्यावर”मारून आंदोलन आणि गर्दी जमवली जात आहे. कुठेही सोशल डिस्टनसिंग नाही गर्दी च गर्दी अस असून “करोना हृदय सम्राट”गप्प का?आणि हो सोशल डिस्टनसिंग चा फज्जा म्हणणारे पत्रकार आज तो शब्द विसरून हा आक्रमक तो आक्रमक म्हणतायत
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) August 24, 2021
शिवसेनेचे नाशिकमधील शहाराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी नारायण राणेंविरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
“आमचा सीएम जगात भारी”, मुख्यमंत्र्यांवर मनसेचा खोचक पण मजेशीर टोला
Mumbai Confidential: Shiv Sena’s comeback plan
आता या वादाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी शिवसेना-भाजप आमने-सामने आले आहेत. पोलिसांनी समजूत काढल्यानंतरही कार्यकर्त्यांनी न ऐकल्याने विविध शहरांमध्ये पोलिसांना लाठीचार्ज करावा लागत आहे. युवासेना नेते वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वात राणेंच्या मुंबईतील घरावर काढलेल्या मोर्चा वेळी मोठी गर्दी केली आहे. ‘ना मास्क, ना सोशल डिस्टंसिंग’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशांचे शिवसैनिकांकडूनच उल्लंघन केले जात आहे.