32 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
Homeसिनेमाअमिताभ यांच्या बंगल्याबाहेर "बीग बी शो बिग हार्ट" म्हणत मनसेची पोस्टरबाजी

अमिताभ यांच्या बंगल्याबाहेर “बीग बी शो बिग हार्ट” म्हणत मनसेची पोस्टरबाजी

टीम लय भारी

मुंबई :- बॉलिवूडचे महानायक म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन आता एका नवीन चर्चेत आले आहेत. अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील प्रतीक्षा बंगल्याच्या बाहेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी पोस्टर्स लावली आहेत. बुधवारी रात्री ही पोस्टर्स मनसेच्या कार्यकर्त्यांकडून लावण्यात आली होती (MNS poster display outside Amitabh bungalow).

बिग बी यांचा प्रतीक्षा बंगला हा संत ज्ञानेश्र्वर मार्गावर बांधलेला असून मुंबई महानगर पलिकेला हा रस्ता रुंद करायचा आहे. त्यामुळे अमिताभ यांच्या प्रतीक्षा बंगल्याची एक भिंत तोडावी लागणार आहे. परंतु महानगर पालिकेने अमिताभ यांना नोटीस पाठवली असूनदेखील अमिताभ यांच्याकडून अद्याप कोणतेही उत्तर आलेले नाही.

शरद पवार यांच्या हस्ते, मुंबईच्या डब्बेवाल्यांना मोफत सायकल वाटप

अकोला बस स्थानकावरील पिण्याच्या पाण्यात ‘शिदोड’

याच पाश्र्वभूमीवर मनसे कार्यकर्त्यांनी अमिताभ यांच्या प्रतीक्षा बंगल्याबाहेर पोस्टर लावले आहेत. “मोठे महानायक आपला मोठेपणा दाखवा. हीच प्रतीक्षा. संत ज्ञानेश्र्वर मार्गाचे रुंदीकरण करण्यास मुंबई महानगर पालिकेला आणि जनतेला सहकार्य करावे.” असे या पोस्टर्सवर लिहण्यात आले. मनसे विभाग अध्यक्ष मनिष धुरी यांच्या नेतृत्वात ही पोस्टर्स लावण्यात आली आहेत (The posters have been put up under the leadership of MNS division president Manish Dhuri).

MNS poster display outside Amitabh bungalow
अमिताभ बच्चन

मनसेने मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची उडविली खिल्ली

90 करोड़ के कर्ज में डूबे हुए थे अमिताभ बच्चन, घर आकर धमकी और गालियां देते थे लोग

२०१७ मध्ये पालिकेने अमिताभ यांना नोटीस पाठवली होती. परंतु अमिताभ यांनी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. वाढत्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी मुंबई पालिकेने रस्ता रुंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ६० फूट रुंद रस्ता करायचा आहे जो आता ४५ फूट रुंद एवढा आहे. आता अमिताभ बच्चन या सर्व प्रकरणावर काय प्रतिसाद देतायत हे पाहणे गरजेचे आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी