31 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
Homeराजकीयरोहित पवारांनी केले मुख्यमंत्र्यांचे कौतुक; तर भाजपला लगावला टोला

रोहित पवारांनी केले मुख्यमंत्र्यांचे कौतुक; तर भाजपला लगावला टोला

टीम लय भारी

मुंबई :- आमदार रोहित पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे अभिनंदन केले आहे. नुकताच प्रश्नम या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. यात देशातील 13 राज्यांमधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अव्वल मुख्यमंत्री ठरले आहेत. यावरून रोहित पवार यांनी भाजपला चिमटा काढत टोला लगावला आहे (Rohit Pawar praised the Chief Minister and lashed out at the BJP).

रोहित पवारांनी ट्विट करुन उद्धव ठाकरेंचे अभिनंदन तर केलंच, शिवाय भाजपवरही निशाणा साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देशातील 13 राज्यांमध्ये अव्वल मुख्यमंत्री ठरले आहेत. प्रश्नम या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यानंतर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी याच मुद्द्यावरुन भाजपवर निशाणा साधला आहे. भाजप नेते उत्तर प्रदेशचे कौतुक करत असतात, पण या सर्वेक्षणात यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पाचवा नंबर आहे, हे भाजपने विसरु नये  असा टोला रोहित पवारांनी भाजपला लगावला आहे (BJP should not forget that Yogi Adityanath is number five, says Rohit Pawar).

अमिताभ यांच्या बंगल्याबाहेर “बीग बी शो बिग हार्ट” म्हणत मनसेची पोस्टरबाजी

मनसेने मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची उडविली खिल्ली

रोहित पवार ट्विट मध्ये म्हणाले की, “प्रश्नम’ या संस्थेने देशातील १३ राज्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचं स्पष्ट झालं. याबाबत मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून अभिनंदन! मुख्यमंत्र्यांनी आधीच सांगितल्याप्रमाणे हे मविआ सरकारचं यश आहे असे रोहित पवार ट्विटमध्ये म्हणाले आहेत (Rohit Pawar has tweeted that this is a success of the Mavia government).

यानंतर दुसरे ट्विट करत त्यांनी भापवर निशाणा साधला आहे. या ट्विटमध्ये रोहित पवार म्हणाले, उठ-सूट सरकारवर टीका करणाऱ्या भाजपला या बातमीने आनंद होणार नाही, पण त्यांनी दुःख वाटून घेऊ नये. विशेषत: ज्या उत्तर प्रदेश सरकारचं भाजपकडून नेहमी गुणगान केलं जातं तेथील मुख्यमंत्र्यांचा या सर्वेक्षणात तब्बल पाचवा क्रमांक आहे, हे त्यांनी विसरु नये!” असा टोला रोहित पवारांनी भाजपला लगावला आहे.

Rohit Pawar praises CM So the BJP was attacked
रोहित पवार

शरद पवार यांच्या हस्ते, मुंबईच्या डब्बेवाल्यांना मोफत सायकल वाटप

Uddhav Thackeray, Shivraj Singh Chouhan most popular CMs in 13-state approval ratings

या 13 राज्यांमधुन मुख्यमंत्री अव्वल

प्रश्नमकडून देशातील 13 राज्ये निवडण्यात आली होती. त्यात बिहार, गोवा, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, पंजाब, मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांचा समावेश आहे. या 13 राज्यांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सर्वाधिक पसंती मिळाली (Out of these 13 states, Chief Minister Uddhav Thackeray got the most likes).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी