34 C
Mumbai
Saturday, May 11, 2024
Homeमुंबईमनसेच्या गजाजन काळेंनी संजय राऊतांना काढला चिमटा

मनसेच्या गजाजन काळेंनी संजय राऊतांना काढला चिमटा

टीम लय भारी

मुंबई : मनसेचे नवी मुंबईचे शहराध्यक्ष गजानन काळे हे कायमच शिवसेना पक्ष, संजय राऊत, आदित्य ठाकरे यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून बोचरी टीका करत असतात. आणि त्यामुळे मनसेचे प्रवक्ते असलेले गजानन काळे नेहमीच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेचा विषय ठरतात. गजानन काळे यांनी नुकतेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या बाबतीत ट्विटरवर एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी शिवसेना पक्षाला संजय राऊत यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पाठविण्याचा सल्ला दिला आहे.

शिवसेना पक्षाला भगदाड पडल्यानंतर आदित्य ठाकरेंनी दौऱ्याला सूरुवात केली आहे. आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या या दौऱ्यांना निष्ठा यात्रा नाव दिले आहे. त्यामुळे गजाजन काळे यांनी आदित्य ठाकरेंवर देखील निशाणा साधला आहे. त्यांनी केलेल्या या ट्विटमध्ये शिवसेना पक्षाला लागलेल्या गळतीला संजय राऊत जबाबदार असल्याचे म्हणत टोला लगावला आहे.

गजानन काळेंनी केलेल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, ‘पक्षातील गळती थांबावी म्हणून छोटे नवाब आता निष्ठा यात्रा काढणार आहेत म्हणे…!😅 खरं तर ‘चमत्कार बाबा’ संजय राऊत यांना कायमचं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पाठवलं तरी यांच्या नवाब सेनेवरील विघ्न टळेल … मात्र यांचं आपलं झालंय असं की जखम एकीकडे, मलम भलतीकडे … 😂🤭’ असे म्हणत शिवसेना पक्ष आपला पक्ष पुन्हा एकदा नव्याने वाढविण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांवर बोचरी टीका केली आहे.

हे सुद्धा वाचा :

बाळासाहेब थोरातांच्या कन्येने मनसे नेत्याला फटकारले!

मनसेच्या संदीप देशपांडेंनी ठाकरे बाप-लेकाला डिवचले

राज्याची शोभा होईल अशी ही राज्यसभा निवडणूक :  मनसे नेते गजानन काळे

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी