31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeसिनेमाअभिनेता रजत बेदीच्या कारची पादचाऱ्याला धडक

अभिनेता रजत बेदीच्या कारची पादचाऱ्याला धडक

टीम लय भारी

मुंबई : अभिनेता रजत बेदीच्या कारने धडक दिल्यामुळे मुंबईच्या डी एन नगर परिसरात राहणारी ३९ वर्षीय व्यक्ती जखमी झाली आहे. रजत बेदीविरोधात मुंबईतील डी एन नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Rajat Bedi car hits pedestrian).

सोमवारी कामावरुन परत येत असताना रजतच्या गाडीने रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला धडक दिली होती. रजत बेदीनेच त्याला कूपर रुग्णालयात दाखल केले आणि मदत करण्याचे आश्वासनही दिले, अशी माहिती जखमी व्यक्तीच्या कुटुंबाने दिली आहे. जखमी राजेश रामसिंग दूत यांची प्रकृती गंभीर आहे.

अरूणिता कांजीलाल व पवनदीप राजन यांचा रोमँटिक व्हिडिओ व्हायरल…

‘इंडियन आयडॉल 12’ च्या ट्रॉफीवर पवनदीपने मारली बाजी

डी एन नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक मिलिंद कुर्डे यांनी सांगितले, की अभिनेता रजत बेदीविरोधात आयपीसी कलम २७९ आणि ३३८, तसेच मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमांखाली एफआयआर नोंदवण्यात आला आहे. कुर्डे म्हणाले की, कार स्वतः रजत बेदी चालवत होता. रस्ता क्रॉस करणाऱ्या व्यक्तीला रजतच्या गाडीने उडवले. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही (No arrests have been made yet).

‘बालिका वधू’ फेम सिद्धार्थ शुक्लाचे निधन

Case registered against ‘Koi… Mil Gaya’ actor Rajat Bedi for allegedly knocking down man with his car

पादचाऱ्याच्या डोक्याला दुखापत

जखमी राजेश रामसिंग दूत यांच्यावर उपचार करणाऱ्या एका डॉक्टरने सांगितले, “त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे, कारण त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. ते आयसीयूमध्ये असून ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. त्यांना तातडीने रक्ताची गरज आहे.”

राजेशची पत्नी बबिता दुत म्हणाली, “माझे पती कामावरून परतत असताना संध्याकाळी ६.३० वाजता अंधेरी वेस्ट लिंक रोडवर शीतला देवी मंदिराजवळ ही घटना घडली. अभिनेता रजत बेदी एमएच ०२ सीडी ४८०९  ही आपली कार चालवत होता, त्याने माझ्या पतीला रस्ता ओलांडत असताना धडक दिली. तो खाली पडला, त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला दुखापत झाली आहे. माझ्या पतीला काही झाल्यास रजत बेदी जबाबदार असेल, त्याला अटक करा अशी मागणी बबिता यांनी केली आहे.

पोलीस हॉस्पिटलला पोहोचेपर्यंत रजत बेदी निघून गेला होता, त्यानंतर तो परतला नाही. डीएन नगर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावले आहे (DN Nagar police have summoned him for questioning).

 Rajat Bedi car hits pedestrian
रजतच्या गाडीने रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला धडक दिली

कोण आहे रजत बेदी?

अभिनेता रजत बेदीने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत. इंटरनॅशनल खिलाडी, जोडी नंबर वन, जानी दुश्मन, कोई मिल गया, अक्सर, पार्टनर यासारख्या सिनेमांमध्ये तो झळकला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी