31 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeसिनेमासैफला अमृताने 'हा' दिला होता सल्ला

सैफला अमृताने ‘हा’ दिला होता सल्ला

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : सैफ अली खान आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंह हे जरी विभक्त राहतात तरी सुध्दा अमृता सिंह ने सैफ अली खानला जो सल्ला दिला होता त्या सल्ल्याबाबत सैफने एका मुलाखतीमध्ये त्याचा उल्लेख केला.

सैफने पहिली पत्नी अमृताचे कौतुक केले. केवळ अमृताच अशी व्यक्ती होती, जिने काम गंभीरतेने घ्यायला शिकवले. ‘स्वतःवर विश्वास ठेव असे सांगितले होते. सैफने सांगितले, “मी घरातून पळून गेलो होतो आणि 20 वर्षांच्या वयात लग्न केले होते. मी अमृता माझ्या पहिल्या पत्नीला याचे श्रेय देतो की, ती एकमेव अशी व्यक्ती होती जिने हे सर्व गंभीरतेने करायला शिकवले. ती मला म्हणाली होती की, जर लक्ष्यावर हसशील तर ते कधीच साध्य करू शकणार नाहीस. त्यानंतर मला ‘परंपरा’ (डेब्यू चित्रपट) मिळाली.” यश चोप्राच्या दिग्दर्शनात बनलेला हा चित्रपट 1994 मध्ये रिलीज झाला होता. चित्रपटात सुनील दत्त, विनोद खन्ना, आमिर खान आणि रवीना टंडनदेखील मुख्य भूमिकेत होते.

सैफने पुढे सांगितले, जेव्हा त्याला फरहान अख्तरच्या दिग्दर्शनात बनलेला चित्रपट ‘दिल चाहता है’ मिळाला, तेव्हा तो आपल्या भूमिकेबद्दल कन्फ्यूज होता. त्याला कळत नव्हते की, ते पात्र कसे साकारावे. तेव्हा अमृताने त्याला स्वतःवर विश्वास ठेवायला सांगितले.असंही सैफ एका मुलाखतीत म्हणाला.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी