25 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
Homeसिनेमा...त्या बातम्या मानहानीकारक कशा असू शकतात; मुंबई उच्च न्यायालयाचा शिल्पा शेट्टीला उलट...

…त्या बातम्या मानहानीकारक कशा असू शकतात; मुंबई उच्च न्यायालयाचा शिल्पा शेट्टीला उलट प्रश्न

टीम लय भारी

मुंबई:- अश्लील चित्रपट बनवण्यासाठी राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. राज कुंद्रा यांच्या अटकेनंतर प्रसार माध्यमात शिल्पा शेट्टीचे नाव घेतले जात आहे. प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांमुळे व्यथित होऊन अभिनेत्री शिल्पा शेट्टीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण, मुंबई पोलिसांच्या रिपोर्टवर आधारीत बातम्या या मानहानीकारक कशा असू शकतात? असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने शिल्पा शेट्टीला विचारला (Shilpa Shetty has been cross-examined by the Mumbai High Court).

राज कुंद्रा यांच्या अटकेनंतर प्रसार माध्यमात येत असलेले शिल्पा शेट्टीचे नाव यामुळे आपली बदनामी होते, असा दावा शिल्पा शेट्टीने न्यायालयात केला होता. यावरुन बराच वेळ न्यायालयात युक्तीवाद देखील झाला. मात्र, तुम्ही एक सेलिब्रिटी आहात लोकांना तुमच्याबद्दल वाचायला आवडते, म्हणून लिहिले जाते. तसेच तुमच्याशी संबंधीत काही घडते आणि त्याबद्दल जर लिहिले गेले असेल तर त्यांवर तुम्ही बंधने आणण्याची मागणी कशी काय करू शकता? असा उलट प्रश्नच न्यायालयाने शिल्पा शेट्टीला विचारला.

Shilpa Shetty has been cross-examined by the Mumbai High Court
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा

शिल्पा शेट्टी यांचा प्रसारमाध्यमांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा

भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू क्वार्टर फायनलमध्ये धडकणार

आता तुमच्या बद्दल काही चांगले लिहीयाचे की काहीच लिहू नका, हे आम्हा कसे सांगू शकतो, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी स्पष्ट केले. तसेच, या याचिकेत प्रतिवादी करण्यात आलेल्या सर्वांना 18 ऑगस्टपर्यंत तर शिल्पा शेट्टीला 26 ऑगस्टपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश देत याचिकेची सुनावणी 20 सप्टेंबरपर्यंत तहकूब केली (Shilpa Shetty directed to file reply by August 26).

Shilpa Shetty has been cross-examined by the Mumbai High Court
शिल्पा शेट्टीला

कोणी एका प्रसार माध्यामाने दाखवेल्या बातमीचा आधार घेवून तुम्ही सरसकट सर्वांवर बंधने आणण्याची मागणी करत आहात, हे धक्कादायक आहे असा सरसकट निर्देश देता येत नाही. आपला लोकशाही देश आहे इथे अभिव्यक्त स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. प्रसार माध्यमांना देखील पूर्ण स्वातंत्र्य आहे. पण पत्रकारीता ही विश्वासहार्य आणि जबाबदारीने केली पाहिजे हे ही तितकेच खरे आहे त्यामुळे न्यायालय असे निर्देश देवू शकत नाही, असे सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी स्पष्ट केले (Justice Gautam Patel clarified that the court could not issue such directions).

अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे 1,800 कोटींचे नुकसान

Amidst Raj Kundra case, Hansal Mehta breaks his silence in support of Shilpa Shetty; ‘Let the law decide?’

यावर आम्ही कोणावर बंदी घालण्याची मागणी करत नाही. मात्र, वार्तांकन करताना वैयक्तिक पातळीवर टिका टिप्पणी नसावी असा युक्तीवाद शिल्पा शेट्टीने केला आहे (Shilpa Shetty say that there should be no criticism on a personal level).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी