31 C
Mumbai
Wednesday, July 3, 2024
Homeसिनेमासुनील शेट्टीला चाहते म्हणाले, जीवन कसे जगावे तुमच्याकडून शिकले पाहिजे... व्हिडिओ पाहा

सुनील शेट्टीला चाहते म्हणाले, जीवन कसे जगावे तुमच्याकडून शिकले पाहिजे… व्हिडिओ पाहा

टीम लय भारी

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टी आता चित्रपटांमध्ये फार सक्रिय दिसत नाही, परंतु त्याच्या फॅन फॉलोइंगमध्ये कोणतीही कमतरता नाही. अण्णा म्हणून प्रसिद्ध असलेले सुनील शेट्टी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. नुकताच सुनील शेट्टीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर त्याच्या एका चाहत्याने जीवन कसे जगावे तुमच्याकडून शिकले पाहिजे, अशी प्रतिक्रिया दिली आहे (This video of Sunil Shetty is going viral).

सुनील शेट्टी नेहमीच आपल्या इंस्टाग्राम खात्यावर आपल्या चाहत्यांसाठी काही तरी खास पोस्ट करत असतो. सुनील शेट्टी फिटनेस व्हिडिओसह चाहत्यामध्ये त्याची प्रत्येक कृती शेअर करतो. सुनील शेट्टीने आता पुन्हा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सुनील शेट्टी निसर्गाच्या सानिध्यात डोंगरांमध्ये बसून जेवणाचा आनंद घेत आहे. यात, तो कॅमेरामनला त्याच्या सभोवतालची दृश्ये दर्शविण्यासाठी देखील इशारा करीत आहे. सुनील शेट्टीचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होण्याचे कारण म्हणजे, त्याच्या एका चाहत्याने एक कमेंट केली आहे.

शिल्पा शेट्टीचा सुपर डान्सरमध्ये कमबॅक

शिल्पा शेट्टीला दुहेरी चिंता; नवरा तुरुंगात तर नवा चित्रपट अपयशाच्या सावटाखाली

सुनील शेट्टीने आपल्या इंस्टाग्राम खात्यावर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये राखाडी रंगाचा टी-शर्ट आणि निळ्या रंगाची पॅंट तसेच डोळ्यांवर काळा चष्मा आहे, ज्याने त्याचा लूक अधिक आकर्षक दिसत आहे. सुनील शेट्टीने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ‘मायकएन्डपेल्स’ असा हॅशटॅग दिला आहे. चाहत्यांसोबतच सेलेब्सकडूनही त्याच्या व्हिडिओवर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत. एका चाहत्याने लिहिले, ‘अण्णा आयुष्य कसे जगावे हे तुमच्याकडून शिकायला हवे. कृतज्ञता, देशभक्ती, कौटुंबिक माणूस, उत्तम कलाकार, व्यापारी, मोठ्या मनाचे आणि प्रतिष्ठित शरीर, अशा शब्दांत त्याने सुनील शेट्टी याची प्रशांसा केली आहे. सुनील शेट्टीचा हा व्हिडिओ पाच लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suniel Shetty (@suniel.shetty)

Tokyo Paralympics : टेबल टेनिसपटू भाविना पटेलने इतिहास रचला, सुवर्णपदक जिंकण्यापासून एक पाऊल दूर

“Bringing Sixty Back”: Suniel Shetty’s Birthday Work Out Routine Is Making Us Look Bad

सुनील शेट्टीने आता पर्यंत १२० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. सुनील शेट्टीने अॅक्शन हिरो म्हणून बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. सुनील शेट्टीने आपल्या करियरची सुरुवात बलवान या चित्रपटातून केली. आज तो एक अभिनेता तर आहेच त्याचबरोबर एक यशस्वी व्यापारी आहे (Sunil Shetty is an actor as well as a successful businessman).

This video of Sunil Shetty is going viral
सुनील शेट्टीने आता पर्यंत १२0 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे

सुनील शेट्टी बलवान, वक्त हमारा है, पहचान, दिलवाले, अंत, मोहरा, गोपी किशन, हम हैं बेमिसाल, सुरक्षा, रघुवीर, गद्दार, टक्कर, एक था राजा, विश्वासघात, कृष्णा, शस्त्र, सपूत, रक्षक, बॉर्डर, पृथ्वी, भाई, आक्रोश, क्रोध, हेराफेरी, रिफयूजी, जंगल, धडकन, हेरा फेरी या चित्रपटामुळे सुनील शेट्टी नावारूपाला आले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी