33 C
Mumbai
Friday, September 2, 2022
घरमुंबईराणीची बाग : 200 वर्षे जुने वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान गणेश चतुर्थीला...

राणीची बाग : 200 वर्षे जुने वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान गणेश चतुर्थीला खुले राहणार

कोरोना महामारीनंतर या वर्षी गणेशोत्सव (Ganesh Ustav 2022) धुमधडाक्यात होणार आहे. गणपतींच्या आगमानची जोरदार तयारी सुरू आहे. वातावरण उत्सवाच्या उत्साहाने भारावून गेले आहे. त्यामुळे राज्यासह मुंबईतही गणेशोत्सव जल्लोषात साजरा केला जाणार आहे. मुंबईत लालबागचा राजा (Lalbaghcha Raja), चिंतामणी, काळाचौकीचा गणपती, असे प्रसिद्ध सार्वजन‍िक गणपती आहेत. या गणपतींच्या आगमनांनंतर भाव‍िक दर्शनासाठी खूप गर्दी करतात. रात्रंदिवस मुंबईत गणेशोत्सवाची (Ganeshi Chaturthi) धामधूम असते. शिवाय गणेशोत्सवाच्या दिवशी सार्वजन‍िक सुट्टी देखील आहे.

कोरोना महामारीनंतर या वर्षी गणेशोत्सव (Ganesh Ustav 2022) धुमधडाक्यात होणार आहे. गणपतींच्या आगमानची जोरदार तयारी सुरू आहे. वातावरण उत्सवाच्या उत्साहाने भारावून गेले आहे. त्यामुळे राज्यासह मुंबईतही गणेशोत्सव जल्लोषात साजरा केला जाणार आहे. मुंबईत लालबागचा राजा, चिंतामणी, काळाचौकीचा गणपती, असे प्रसिद्ध सार्वजन‍िक गणपती आहेत. या गणपतींच्या आगमनांनंतर भाव‍िक दर्शनासाठी खूप गर्दी करतात. रात्रंदिवस मुंबईत गणेशोत्सवाची (Ganeshi Chaturthi) धामधूम असते. शिवाय गणेशोत्सवाच्या दिवशी सार्वजन‍िक सुट्टी देखील आहे. त्यामुळेच या दिवशी नागर‍िकांना पर्यावरणाचा आनंद घेता यावा म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबईकरांसाठी (BMC) भायखळा पूर्व परिसरातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय नागरिकांसाठी खुले केले आहे. त्यामुळे 31 ऑगस्ट 2022 रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी हे उदया खुले आहे.

या उदयानात प्राणी, वनस्पती आणि पक्षी आहेत. मात्र गरुवारी 1 सप्टेंबराला हे उदयान बंद राहणार आहे. हे उदयान आठवड्याची सुटटी वगळता सर्व दिवशी खुले असते. त्या दिवशी सकाळी 9.30 ते संध्याकाळी 5.00 दरम्यान उदयानाची तिकीट ख‍िडकी सुरू असते. उद्यान सायंकाळी 6.00 वाजता बंद होते.या उद्यानात प्रवेशासाठी प्रती व्यक्ती 50 रुपये शुल्क 3 ते 15 वयोगटातील मुलांसाठी 25 रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येते. तर आई-वडील आणि 15 वर्षे वयापर्यंतची 2 मुले आशा 4 जणांसाठी 100 रुपये शुल्क आकारण्यात येते.

हे सुद्धा वाचा

VIDEO : अष्टविनायक दर्शन : तिसरा गणपती सिद्धटेकचा सिद्धिविनायक

उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या दसरा मेळाव्याच्या विधानाने उद्धव ठाकरेंची डोकेदुखी आणखी वाढणार?

Jayant Patil : चौकशा लावून आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे – जयंत पाटील

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान म्हणजेच राणीची बाग ही मुंबईमधील सर्वात जुनी आणि मोठी बाग आहे. इंग्रजांनी तिचे नाव ‘क्वीन व्हिक्टोरिया गार्डन’ (Queen Victoria Garden) असे ठेवले होते. ही बाग भायखळा येथे असून, 53 एकरांमध्ये आहे. ही बाग 19 नोव्हेंबर 1862 मध्ये लेडी कॅथरीन फे्रअर यांनी सुरु केली. ही बाग दोनशे वर्षे जुनी आहे. राणीच्या बागेत झाडे, झुडपे, वेली यांनी शंभरी ओलांडली आहे.

या बागेमध्ये 286 प्रजातींचे 3,213 वृक्ष आणि 853 जातींच्या वनस्पती आहेत. या शिवाय सस्तन प्राणी, पक्षी आणि कीटकांचे या ठिकाणी वास्तव्य आहे. इथल्या अनेक झाडांनी शंभरी पार केली आहे. अनेक दुर्मीळ झाडे या ठिकाणी आहेत. या बागेमध्ये प्राणि संग्रहालय देखील आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी