27 C
Mumbai
Sunday, April 14, 2024
Homeमुंबईउद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून वारिशे कुटुंबीयांना २५ लाखांची मदत

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून वारिशे कुटुंबीयांना २५ लाखांची मदत

रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या करण्यात आल्यानंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी ही राजकीय हत्या असल्याचा आरोप केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आंगणेवाडीतील भाषणानंतर २४ तासांत वारीशे यांची हत्या करण्यात आली हा योगायोग आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात केला होता. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या हेतूविषयी लोकांच्या मनात संशय निर्माण झाला आहे. त्यानंतर शनिवारी राऊत यांनी वारीशे यांचा मारेकरी पंढरीनाथ आंबेरकर याच्यासोबत उद्योगमंत्री उदय सामंत यांचे छायाचित्र ट्विट केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. मात्र, उदय सामंत यांनी जमिनीचा दलाल आंबेरकर याच्याशी आपले कोणतेच संबंध नसल्याचा दावा केला होता. या सर्व पार्श्वभूमीवर आता सामंत यांनी वारिशे यांच्या कुटुंबियांना शासनाकडून मदत मिळवून दिली आहे. (25 lakhs help to Warishe family from Minister Uday Samant)

शशिकांत वारिशे यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबातील त्यांचा एक मुलगा आणि आजी यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे. या कुटुंबियांना शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी पत्रकार संघटनांकडून संपूर्ण महाराष्ट्रातून करण्यात येत होती. रविवारी रत्नागिरीत रोजगार महामेळाव्याच्या निमित्ताने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपस्थित पत्रकारांनी पत्रकार वारिशे यांच्या कुटुंबियांना शासनाकडून मदत मिळावी, ही मागणी उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे पुन्हा मांडली.

पत्रकारांच्या या मागणीची दखल घेत उदय सामंत यांनी तात्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. या चर्चेत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १० लाख व इतर माध्यमातून १५ लाख रुपयांची मदत दिवंगत पत्रकार वारिशे यांच्या कुटुंबियांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय वारिसे यांच्या मुलाला कायमस्वरूपी नोकरी देण्याची जबाबदारीही उदय सामंत यांनी स्वीकारली आहे.

हे सुद्धा वाचा

शशिकांत वारीशे यांच्या हत्येचा निषेधार्थ मुंबईतील पत्रकारांची आज मुक निदर्शने

फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर २४ तासांत पत्रकार वारिशे यांची हत्या, हा योगायोग समजावा का?

बरं झालं ब्याद गेली ; भगतसिंग कोश्यारींच्या जाचातून अखेर महाराष्टाची सुटका…

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी