33 C
Mumbai
Saturday, May 13, 2023
घरमुंबईBigg Boss 16 Grand Finale : कोण बनणार विजेता? पाहायला विसरू नका...

Bigg Boss 16 Grand Finale : कोण बनणार विजेता? पाहायला विसरू नका…

मागील चार महिने बिग बॉसचे घर म्हणजे आपलेच घर आहे, असे लोकांना वाटू लागले होते. आपणही कळत-नकळतपणे स्वतःला बिग बॉसच्या घरातील सदस्यच समजू लागलो होतो. पण आज या घरातून निरोप घेण्याची वेळ आली आहे. ‘बिग बॉस सीजन १६’ चा विजेता कोण होतो याबाबत लोकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. लवकरच हा विजेता आपल्यासमोर येणार आहे. नेहमीच आपले हृदय आणि मेंदू यांचा सुरेख वापर करत प्रतिस्पर्ध्याला जेरीस आणणारा ‘आपला माणूस’ शिव ठाकरे या ट्रॉफीवर आपले नाव कोरतो का दुसऱ्यांच्या मुद्द्यात आपले नाक खुपसून उपद्रव मूल्य वाढवणारी प्रियांका चौधरी बिग बॉसची सम्राज्ञी ठरते ते सायंकाळी लोकांना पाहायला मिळेल.(Who will be the winner of Bigg Boss 16? Don’t forget to watch…)

shiv Thackeray constant
मूळचा अमरावतीकर असलेल्या शिव ठाकरेच्या विजयासाठी अमरावतीत गल्लोगल्लीत प्रार्थना करण्यात येत आहेत.

संध्याकाळी ७.०० वाजता कलर्स वाहिनीवर हा रंगतदार सोहळा होणार आहे. voot app वरही या ग्रँड फिनालेचा आनंद प्रेक्षकांना लुटता येणार आहे. यावेळी अंतिम फेरीत पोहोचलेल्या पाच स्पर्धकांव्यतिरिक्त बिग बॉसच्या घरातून बेघर झालेले अन्य स्पर्धक आपला धमाकेदार परफॉर्मन्स सादर करणार आहेत. खरी स्पर्धा शिव आणि प्रियांका या दोघांमध्येच असल्याचही चर्चा समाजमाध्यमांवर जोरात सुरु आहे. या सिजनमधले सर्वात दमदार खेळाडू म्हणून शिव आणि प्रियंकाने आधीपासूनच आपली पकड मजबूत केली होती. या दोघांनीही प्रत्येक टास्कमध्ये फ्रंट फुटवर खेळ सादर केला. त्यामुळे त्यांच्या या जिगरबाज प्रदर्शनाने त्यांनी लोकांची मने जिंकली.

ग्रँड फिनालेमध्ये पोहोचण्यासाठी प्रत्येक स्पर्धकाने कसोशीने प्रयत्न केले. पण पहिली पाच स्पर्धकांमध्ये केवळ शिव ठाकरे, प्रियंका चाहर चौधरी, शालीन भनोट, एमसी स्टैन आणि अर्चना गौतम यांनाच आपले स्थान निर्माण करता आले. यातील एक जण बिग बॉसच्या ट्रफीवर आपले नाव कोरणार आहे. प्रियांकाचा चाहता वर्ग फार मोठा आहे. त्यामुळे शिवला ही स्पर्धा जिकंण्यासाठी खरेतर प्रियांकाचेच आव्हान आहे. प्रियांका फॅन क्लबवर तर प्रियांकाच्या चाहत्यांनी मोहीमच उघडली आहे. अली गोनी, अर्जुन बिजलानी, देवोलीना भट्टाचार्जी यांसारख्या सेलिब्रेटीजनी प्रियांकाचा या स्पर्धेची विजेती ठरेल असे ट्विट केले आहे. अवघ्या काही तासांतच या रहस्यवरून पडदा उठणार आहे. तेव्हा पाहायला विसरू नका…

हे सुद्धा वाचा

Big Boss 16 : ‘मला शर्ट काढायला भाग पाडू नका’, बिगबॉसच्या सेटवर भाईजान भडकला! पाहा व्हिडिओ

Big Boss 16 : बिगबॉसचा पहिल्या स्पर्धकाला ओळखलंत का?

Big Boss 16 : बिग बॉस 16 मध्ये मिस इंडिया उपविजेती पसरवणार सौंदर्याची जादू

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी