30 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeराजकीयवारीशेंचा मारेकरी आंबेरकरच्या गाडीवर रिफायनरी कंपनीचा लोगो ; अंगणेवाडी जत्रेत तो कोणत्या...

वारीशेंचा मारेकरी आंबेरकरच्या गाडीवर रिफायनरी कंपनीचा लोगो ; अंगणेवाडी जत्रेत तो कोणत्या नेत्यांना भेटला?

दिवंगत पत्रकार शशिकांत वारीशे यांची हत्या जरी पंढरीनाथ आंबेरकर याने केली असली तरी त्याच्या हत्येमागचा खरा सूत्रधार कोण आहे याबाबत आता तर्कवितर्कांना उधाण आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ज्या रिफायनरी कंपनीच्या प्रकल्पाविरोधात वारीशे यांनी बातम्या प्रसिद्ध केल्या त्याच रिफायनरी कंपनीचा लोगो भूमाफिया आंबेरकर याच्या गाडीच्या मागील काचेवर चिकटवण्यात आला आहे. या आशयाची फेसबुक पोस्ट शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी शेअर केली आहे. आंगणेवाडीतील जत्रेत आंबेरकर भाजपच्या कोणकोणत्या नेत्यांना भेटला? असा सवालही संजय राऊत यांनी विचारला आहे. त्यामुळे या हत्या प्रकरणामागे राजकीय षडयंत्र असल्याची साशंकता व्यक्त होत आहे. (Refinery company logo on the car of Varishe’s killer Amberkar)

Refinery company logo on the car of Varishe's killer Amberkar
पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्या प्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दिवंगत पत्रकार वारिशे यांचा रत्नागिरीतील नाणार येथे होणाऱ्या रिफायनरीला विरोध होता. या प्रकल्पाविरोधात त्यांनी अनेक लेख, बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. या हत्या प्रकरणावरून संजय राऊत यांनी सरकारच्या हेतूबाबत संशय व्यक्त केला आहे. हे राजकीय षडयंत्र असल्याची टीका त्यांनी केली असून त्याबाबतचे पुरावेदेखील सादर केले आहेत.

शशिकांत वारीशे यांची भूमाफिया आंबेरकर याने आपल्या ‘एसयूव्ही’ गाडीखाली चिरडून क्रूरपणे हत्या केली. त्याच गाडीच्या मागील बाजूच्या काचेवर रिफायनरी कंपनीचा लोगो आहे. हत्येच्या आदल्या दिवशी आरोपी पंढरी आंबेरकर हा अंगणेवाडी येथील जत्रेत हजर होता. याच दिवशी भारतीय जनता पक्षाने जाहीरसभा आयोजित केली होती. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री नारायण राणे हेदेखील उपस्थित होते. हाच संदर्भ देत संजय राऊत यांनी गंभीर सवाल उपस्थित केला आहे. वारिशे यांच्या हत्येच्या आदल्या दिवशी आरोपी आंबेकर अंगणेवाडीच्या जत्रेत कोणत्या नेत्यांना भेटला? असा प्रश्न संजय राऊतांनी विचारला.

हे सुद्धा वाचा 

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून वारिशे कुटुंबीयांना २५ लाखांची मदत

बरं झालं ब्याद गेली ; भगतसिंग कोश्यारींच्या जाचातून अखेर महाराष्टाची सुटका…

फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर २४ तासांत पत्रकार वारिशे यांची हत्या, हा योगायोग समजावा का?

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी