33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
HomeमुंबईSanjay Gandhi National Park : लवकरच गुजरातमधील सिंह मुंबईच्या नॅशनल पार्कमध्ये येणार!

Sanjay Gandhi National Park : लवकरच गुजरातमधील सिंह मुंबईच्या नॅशनल पार्कमध्ये येणार!

गुजरात मधील सक्करबाग येथील सिंहाची जोडी नोव्हेंबर अखेरीस मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल होणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ही सिंहाची जोडी पाठविण्यासाठी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकारणाने परवानगी दिली आहे.

मुंबईकरांना लवकरच गुजरातमधील आशियायी सिंहाची जोडी पाहता येणार आहे. गुजरात मधील सक्करबाग येथील सिंहाची जोडी नोव्हेंबर अखेरीस मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल होणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ही सिंहाची जोडी पाठविण्यासाठी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकारणाने परवानगी दिली आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता लवकरच ही आशियायी सिंहाची जोडी पाहता येणार आहे.

२६ सप्टेंबर रोजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या गुजरात दौऱ्याच्या वेळी गुजरातचे वन राज्यमंत्री जगदीश विश्वकर्मा यांच्याशी याविषयी चर्चा झाली होती. त्यावेळी गुजरातमधील सिंहाची जोडी मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पाठविण्याबाबत एकमत झाले होते. केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकारणाच्या परवानगीसाठी हा विषय थांबला होता. आता ही परवानगी मिळाल्याने गुजरात येथील सक्करबाग प्राणी संग्रहालयातील आशियायी सिंहाची जोडी (एक नर व एक मादी ) आता नोव्हेम्बर अखेरीस मुंबईत दाखल होणार आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली येथे १२ हेक्टर कुंपण क्षेत्रात क्षेत्रात १९७५-१९७६ मध्ये सिंह सफारी सुरू करण्यात आली होती. सिंह सफारी मुळे उद्यानाच्या महसुलात वाढदेखील झाली होती ; परंतु केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने सिंहाचे प्रजनन करण्यास मनाई केल्याने येथील सिंहाची संख्या कमी झाली. गेल्या महिन्यात १७ वर्षे वयाच्या सिंहाचा मृत्यू झाल्याने उद्यानात एकच नर सिंह शिल्लक राहिला.

दरम्यान वन मंत्री मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे गुजरात राज्यातील ही सिंहाची जोडी येणार असल्याने उद्यानात पर्यटकांची संख्या पुन्हा वाढणार आहे. तसेच उद्यानाच्या उत्पन्नात देखील त्यामुळे भर पडणार आहे. सध्या उद्यानात एकच सिंह असल्यामुळे आता उद्यानातील सिंहांची संख्या देखील वाढणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत असतात. या पर्यटकांना आता गुजरातमधून आणण्यात येणाऱ्या सिंहाची जोडी पाहता येणार आहे.
हे देखील वाचा :
Mumbai water transport projects : मुंबईतील प्रवासी जल वाहतूक प्रकल्पांमुळे प्रवाशांचा वेळ व पैसा वाचणार!

Bharat Jodo Yatra : महाराष्ट्रातील तरूणांचे रोजगार मोदींनी हिरावून घेतले; राहूल गांधींचा हल्लाबोल

Sanjay Raut Bail : संजय राऊत तुरूंगाबाहेर; शिवसैनिकांनी केले जल्लोषात स्वागत

मुंबईला लागून असलेले अतिशय घनगर्द असे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान असून या उद्यानात अनेक वन्यप्राणी, पक्षी, तसेच जैवविविधता आहे. तसेच या उद्यानात कन्हेरी ही बुद्धकालीन लेणी देखील आहे. या उद्यानात लेणी तसेच प्राणी, पक्षी, जैवविविधता पाहण्यासाठी नेहमीच पर्यटक मोठ्या संख्येने हजेरी लावत असतात. या उद्यानात बिबट्यांचा देखील वावर आहे. असे जैवविविधतेने बहरलेले हे उद्यान मुंबईला लागून असल्याने मुंबईच्या पर्यावरणाचा समतोल देखील या उद्यानामुळे राहतो.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी