32 C
Mumbai
Monday, May 15, 2023
घरमनोरंजनअक्षय गवसाने दिग्दर्शित 'फेमस' या ऍक्शनपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस

अक्षय गवसाने दिग्दर्शित ‘फेमस’ या ऍक्शनपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस

दिग्दर्शक अक्षय गवसाने यांचा 'फेमस' हा नवाकोरा ऍक्शन आणि रोमँटिक चित्रपट लवकरच रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

बॉलीवूड सिनेसृष्टीतल्या Multistar-cast चित्रपटांबद्दल तर आपण सगळेच ज्ञात आहोत. ज्यात एकापेक्षा अधिक प्रमुख अभिनेता अथवा अभिनेत्रीची भूमिका बजवणारे कलाकार असतात. मराठी चित्रपटसृष्टीनेही यात पाऊल टाकले असून अनेक सुपरहीट चित्रपटांची नावे आपल्या डोळ्यासमोर येतात. जसे की, अशी ही बनवा बनवी, सावरखेड एक गाव, पछाडलेला, क्षणभर विश्रांती अशा बऱ्याच चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनात घर करून ठेवले आहे. त्याचप्रमाणे एक अभिनेता आणि दोन अभिनेत्री असलेला सुपरहिट मराठी चित्रपट वृंदावन हा देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. याच पार्श्वभूमीवर दिग्दर्शक अक्षय गवसाने (Akshay Gavsane) यांचा ‘फेमस’ हा नवाकोरा ऍक्शन आणि रोमँटिक चित्रपट रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ज्यात आपणास एका अभिनेत्रीसाठी दोन अभिनेत्यांच्या मुख्य भूमिका दिसणार आहेत.

नुकत्याच लाँच झालेल्या ‘फेमस’ चित्रपटाच्या पोस्टरमध्ये असे पाहायला मिळतंय की, दोन प्रमुख अभिनेत्यांमध्ये एक नायिका उभी आहे. अर्थात पोस्टर पाहून असा अंदाज वर्तविण्यात येत आहे की नायिकेसाठीची मुख्य कलाकारांची धडपड डोळ्यासमोर स्पष्ट दिसतेय. आता मात्र ही पाठमोरी नायिका कोण आहे याचा प्रत्येकजण तर्कवितर्क लावतोय. चित्रपटातील मुख्य नायिकेची झलक पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच ताणली गेली आहे आणि ही उत्सुकता आणखी काही दिवस अशीच राहणार आहे कारण चित्रपटातील मुख्य नायिका प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास काही क्षणाचा अवलंब आहे.

अक्षय गवसाने दिग्दर्शित 'फेमस' या ऍक्शनपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस

गवसाने प्रॉडक्शन हाऊस आणि गायकवाड सन्स प्रॉडक्शन हाऊस प्रस्तुत तसेच ए. जी प्रॉडक्शन हाऊस यांच्या संयुक्त विद्यमाने या चित्रपटाचे दिग्दर्शन अक्षय गवसाने यांनी केले आहे. निर्माते मनोज गवळी, आशिष गुंजेकर, महेश संजय गायकवाड, अंकित बजाज, अक्षय गवसाने यांनी चित्रपटाच्या निर्मितीची धुरा पेलवली असून या चित्रपटात अभिनेता महेश गायकवाड आणि स्वरूप सावंत मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. त्याचप्रमाणे, महेश आणि स्वरूप यांच्यात नायिकेला कोण मिळवणार ही चुरशीची लढाई चित्रपटात पाहणंही रंजक ठरेल. तर या चित्रपटात मेघा शिंदे, साक्षी जाधव, प्रदीप शिंदे, विवेक यादव या कलाकारांना पाहणं रंजक ठरणार आहे. तर चित्रपटात बालकलाकार म्हणून शौर्य प्रदीप चाकणकर आणि श्रीतेज प्रसाद चाकणकर यांनी चांगलीच धमाल केलीय.

या चित्रपटाबाबत बोलताना चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते अक्षय गवसाने असे म्हणाले की, “चित्रपटसृष्टी आणि आमचं अगदी जवळचं नातं आहे. कारण चित्रपटसृष्टीत आमचा कॅटरिंगचा व्यवसाय आहे, त्यामुळे चित्रपट निर्मिती करताना कोणत्या अडचणी येतात, चित्रपट कसा बनतो हे आम्ही अगदी जवळून पाहिलं होतं. दरम्यान कॅटरिंगचे काम करताना पडद्यामागील तांत्रिक गोष्टी आवड म्हणून शिकत ही होतो. त्यावेळी मनात मी एक निश्चय केला की, एक दिवस आपण ही चित्रपटाची निर्मिती करायची. आणि अखेर आज तो दिवस आलाय, वडिलांना आणि घरच्यांना दिलेला शब्द आज पूर्ण होतोय, हा चित्रपट निखळ मनोरंजन आणि ऍक्शन थ्रिलरने भरलेला आहे. तुम्हा रसिक प्रेक्षकांचा आशीर्वाद फक्त पाठीशी ठेवा,” अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

हे सुद्धा वाचा: भाऊराव कऱ्हाडेंच्या टीडीएम चित्रपटात ‘एक फुल’ रोमॅंटिक गाण्याची मेजवानी

अमृता खानविलकर म्हणते, ‘ललिता बाबर’चा चित्रपट हा माझा सर्वोच्च सन्मान

सिनेमा सिक्वेलपेक्षा सीझनचा बोलबाला

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी