26 C
Mumbai
Tuesday, February 27, 2024
Homeराजकीय'कोणाची जमीन खाल्ली, बंगले हाडपले, मला शांत राहू दे...' मनोज जरांगेंचा भुजबळांवर...

‘कोणाची जमीन खाल्ली, बंगले हाडपले, मला शांत राहू दे…’ मनोज जरांगेंचा भुजबळांवर एकेरी उल्लेख

राज्यात अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणावरून अनेक वाद सुरु आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी (Manoj Jarange-Patil) दोन वेळा उपोषण केले. यानंतर सरकारच्या विनंतीला मान देऊन उपोषणही मागे घेतले आहे. यानंतर २४ डिसेंबर ही अंतिम तारीख दिली असून या दिवशी सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत जरांगेंनी मागणी केली आहे. गेल्या आठवड्यापासून जरांगेंनी राज्यात पुन्हा सभा घेत ओबीसी (OBC) प्रवर्गात मराठा समाजाची अडवणूक करणाऱ्या छगन भुजबळांना (Chhagan Bhujbal) धारेवर धरले आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवण्यासाठी मराठा समाज प्रयत्न करत आहे. मात्र यावर दंगली करण्याचा कट असू शकतो असे जरांगेंनी वक्तव्य केलं. (Maratha Reservation)

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे जरांगेंनी सभा घेतली आहे. या सभेसाठी लाखोंच्या संख्येने गर्दी झाली. सभेत बोलत असताना जरांगेंनी भुजबळांचा एकेरी उल्लेख केला आहे. यामुळे आणखी वाद वाढण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. जरांगे म्हणाले की, या टोळीला कळालं आहे की मराठा आता ओबीसीमध्ये जात आहेत. यामुळे आता दंगली करायचा कट असू शकतो. यामुळे आता दंगली होऊ द्यायच्या नाहीत. संयम ठेऊनच आपल्याला सावध व्हावे लागेल. यामुळे आरक्षण मिळेपर्यंत शांतता ठेवायची असल्याचे जरांगे म्हणाले आहे.

हे ही वाचा

‘सरकारकडून बेरोजगारांना सबुरीचे गाजर’ वडेट्टीवारांचा सरकारवर संताप

‘खेळाडू राजकीय नेत्यांहून अधिक शिस्तप्रिय’

‘जय श्री राम, ‘भारत माता की जय’ घोषणा देऊन काय होणार’? भाजप खासदाराचा भाजपला सवाल

भुजबळांचा एकेरी उल्लेख

छगन भुजबळ म्हणतो की, आमच्यात येऊ नका, आम्ही जायचं कुठं? सगळं तुच खाणार वाटतं. घटनेच्या पदावर बसलेला कायदा पायाखाली तुडवत आहे. दंगली होतील असे वक्तव्य करू लागला आहे. भुजबळ यांना आधी व्यक्ती म्हणून विरोध नव्हता मात्र आता माझा व्यक्ती म्हणून देखील विरोध राहिल. आता सुट्टी नाही मराठा समाजाला आरक्षण मिळणार म्हणजे मिळणार. कितीही प्रयत्न केले तरीही आरक्षण मिळणार आहे.

भुजबळांचे आता वय झाले असल्याने त्यांना काही सुधारत नाही. त्यांना माझे सगळं माहित आहे. त्यांना माझं सगळं माहित आहे तर मलाही त्यांचं सगळं माहित आहे. कोणाची जमीन खाल्ली, बंगले हाडपले, मला शांत राहू दे..माझ्या नादी लागू नकोस, मला डिवचू नकोस. आमचं आग्यामोहाळ डेंजर आहे, अशी सडकून टीका जरांगे पाटलांनी भुजबळांवर केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी