28 C
Mumbai
Saturday, March 18, 2023
घरमुंबईअमरिंदर सिंग महाराष्ट्राचे नवे राज्यपाल? भगतसिंग कोश्यारी पायउतार होणार

अमरिंदर सिंग महाराष्ट्राचे नवे राज्यपाल? भगतसिंग कोश्यारी पायउतार होणार

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधाने केल्यामुळे विरोधकांच्या रोषाचे धनी ठरलेले भगतसिंग कोश्यारी यांची लवकरच गच्छंती होणार आहे. आपल्या उलटसुलट विधानांनी नेहमीच वाद निर्माण करणारे कोश्यारी यांच्याविरोधात जनक्षोभ उसळला होता. त्यांच्या राजीनाम्याची मागणी सर्वच स्तरांतून होऊ लागली होती. अखेर पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांची महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून लवकरच नियुक्ती होणार आहे.

हे सुद्धा वाचा

पंतप्रधानांचे लाडके उद्योगपती अदानीशेठचा बाजार उठतोय!

लघुशंकेला २ मिनिटांपेक्षा अधिक वेळ लागलाच कसा? अ‍ॅमेझॉन कर्मचाऱ्यांना गुलामासारखे वागवतेय

Bhagat Singh Koshyari : ग्रामपंचायतीचा कौतुकास्पद ठराव, राज्यपालांना हटवा!

(Amarinder Singh likely to replace Bhagat Singh Koshyari as Maharashtra Governer)
या सर्व पार्श्वभूमीवर भगतसिंग कोश्यारी यांनी आपल्याला पदमुक्त करावे अशी इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती. कोश्यारी यांनी म्हंटले आहे की, “पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान आपल्याला सर्व राजकीय जबाबदारीतून मुक्त करण्यात यावे, मला माझे उर्वरित आयुष्य लेखन, वाचनात व्यतीत करायचे आहे, अशी इच्छा मी व्यक्त केली होती. मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून नेहमीच प्रेम आणि आदराची वागणूक मिळाली”

अमरिंदर सिंग यांनी मागील सप्टेंबर महिन्यात आपला पंजाब लोक काँग्रेस हा पक्ष भारतीय जनता पक्षात विलीन केला होता. पंजाब विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी आपला नवीन पक्ष स्थापन केला होता. नवज्योत सिंग सिद्धू यांची पंजाब काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदावर नेमणूक झाल्यानंतर नोव्हेंबर २०२१ मध्ये अमरिंदर सिंग यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

कोश्यारी यांची वादग्रस्त विधाने

  1. गुजराती आणि राजस्थानी लोकांमुळेच मुंबईला आर्थिक राजधानीचा दर्जा प्राप्त झाला आहे.
  2. मुंबई आणि ठाण्यामधून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास पैसाही राहणार नाही.
  3. शिवाजी तर जुन्या काळातील आदर्श आहेत. मी नवीन काळाबद्दल बोलत आहे.
  4. चाणक्याशिवाय चंद्रगुप्तला आणि समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल?
  5. सावित्रीबाईंचे दहाव्या वर्षीच लग्न झाले होते तेव्हा ज्योतिबा फुले १० वर्षांचे होते. इतक्या लहान वयात लग्न झाल्यानंतर पुढे ते काय करत असतील?

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी