30 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
Homeमुंबईलघुशंकेला २ मिनिटांपेक्षा अधिक वेळ लागलाच कसा? अ‍ॅमेझॉन कर्मचाऱ्यांना गुलामासारखे वागवतेय

लघुशंकेला २ मिनिटांपेक्षा अधिक वेळ लागलाच कसा? अ‍ॅमेझॉन कर्मचाऱ्यांना गुलामासारखे वागवतेय

ब्रिटनमध्ये महागाईने कळस गाठला असून महागाईचा निर्देशांक प्रथमच १० टक्क्यांच्यावर पोहोचला आहे. त्यामुळे मोठमोठ्या कंपन्यांनी नोकरकपात सुरु केल्यामुळे नोकरी टिकवणे जिकिरीचे झाले आहे. याचाच गैरफायदा उठवत 'अमेझॉन' कर्मचाऱ्यांना गुलामासारखे वागवत आहे.

ब्रिटनमध्ये महागाईने कळस गाठला आहे. मागील ४० वर्षांत महागाईचा निर्देशांक प्रथमच १० टक्क्यांच्यावर पोहोचला आहे. त्यामुळे मोठमोठ्या कंपन्यांनी नोकरकपात सुरु केली आहे. अशातच आता नोकरी टिकवून ठेवण्याला सर्वसामान्य नोकरदार प्राधान्य देत आहेत. घरखर्च भागविण्यासाठी तेथील लोकांना आठवड्याचे साठ तास काम करावे लागत आहे. काही नामांकित कंपन्यांनी याचाच फायदा घेण्यास सुरुवात केली असून कामगिरी सुधारण्याच्या नावाखाली व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांवर अत्याचार केले जात आहेत. कर्मचाऱ्यांना गुलामासारखे वागवले जात आहे. लघुशंकेला दोन मिनीटांपेक्षा अधिक वेळ लागलाच कसा? असा वाह्यात प्रश्न विचारला जात आहे. अ‍ॅमेझॉन या बड्या कंपनीतील कर्मचाऱ्यांनी इंग्लंडमध्ये व्यवस्थापनाच्या या जुलमी कारभाराविरोधात वाचा फोडली आहे. (Amazon Workers protest against work environment; treated like slaves) आता तर टॉयलेटलाही जायची चोरी झाली आहे. इथे प्रत्येक मिनिट तपासला जात आहे आणि त्याबद्दल जाबही विचारला जातो, असा गंभीर आरोप डॅरेन वेस्टवूड आणि गारफिल्ड हिल्टन या दोन कर्मचाऱ्यांनी ‘बीबीसी’शी बोलताना केला आहे.

हे सुद्धा वाचा

मायक्रोसॉफ्टसुद्धा १०,००० कर्मचाऱ्यांना नारळ देण्याच्या तयारीत

पंतप्रधानांचे लाडके उद्योगपती अदानीशेठचा बाजार उठतोय!

आता मधुमेहाला करा ‘बाय-बाय’! टाईप-१ आजाराला अटकाव करणाऱ्या औषधास अमेरिकेच्या “एफडीए”ची मान्यता

 

इंग्लंड (युनायटेड किंगडम) मधील अ‍ॅमेझॉन कंपनीतील कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध समस्यांसाठी संप पुकारला आहे. कर्मचाऱ्यांकडून जितके काम करून घेण्यात येते त्याच्या तुलनेत त्यांना देण्यात येणार पगार अगदीच तुटपुंजा आहे. कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनाकडून अपमानास्पद वागणूक देण्यात येत असल्याचे सांगत १५०० पैकी ३०० कर्मचाऱ्यांनी बुधवारी युकेच्या कॉव्हेन्ट्री वेअरहाऊसमधून बाहेर पडत संप पुकारला. येथील कर्मचाऱ्यांवर सतत देखरेख ठेवली हात आहे. त्यामुळे काम करणेही अवघड झाले आहे. व्यवस्थापनाच्या या अतिरेकी बंधनांनी कळस गाठला असून काही वेळ टॉयलेटमध्ये गेला तरी जाब विचारला जातो, अशी कैफियत कर्मचाऱ्यांनी ‘बीबीसी’ शी बोलताना मांडली.

Amazon Workers protest against work environment; treated like slaves

आमच्यापेक्षा ‘रोबोट’ला चांगली वागणूक मिळते
आपल्या व्यथा मांडताना युके जनरल ट्रेड बॉडी (GMB)शी संबंधित कमचाऱ्यांनी ‘बीबीसी’ला सांगितले की, कंपनीत आलेल्या वस्तूंची नोंद करण्यापेक्षा कर्मचाऱ्यांना वेळेबाबत जाब विचारण्यातच अधिकाऱ्यांचा वेळ खर्च होत आहे. आम्हाला कंपनीतील रोबोटपेक्षाही हीन वागणूक देण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी यंत्रणेचा वापर करणे यात काहीच गैर नाही. पण आता अतिरेक होत आहे. एखाद्या कर्मचाऱ्याला लघुशंकेसाठी दोन मिनिटांपेक्षा अधिक वेळ लागला तरी त्याला धारेवर धरले जाते, असे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले.

आम्हाला जेफ बेझोसची संपत्ती नको, सन्मानाने जगू द्या
डॅरेन वेस्टवूड या कर्मचाऱ्याने ‘बीबीसी’ शी बोलताना सांगितले की, ‘आम्हाला जेफ बोझॉसची बोट नको, त्याचे रॉकेट नको, त्याची संपत्तीही आम्हाला नको. आम्हाला केवळ सन्मानाने जगता येईल इतकेच वेतन पाहिजे आहे.’

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी