38 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रबाळासाहेब थोरातांनी महसूल विभागाला हायटेक करण्याबरोबर देशात अव्वल बनवले

बाळासाहेब थोरातांनी महसूल विभागाला हायटेक करण्याबरोबर देशात अव्वल बनवले

टीम लय भारी

संगमनेर :-  महसूल विभागातील काम इन लाइन ऐवजी ऑनलाईन करण्यासाठी आपण पुढाकार घेतला यामुळे नागरिकांना मोठी चांगली सुविधा मिळाली आहे. आगामी काळात सातबारा, ई-फेरफार, चतुर्सीमा सर्वच ऑनलाइन पद्धतीने मिळणार असून अमृतवेल महाराष्ट्र डिजिटल सातबारा हा विशेषांक गौरवास्पद ठरणार असून राज्याच्या महसूल विभागाचे ऑनलाईन कामकाज हे देशातील इतर सर्व राज्यांसाठी अनुकरणीय ठरत असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री  बाळासाहेब थोरात यांनी केले आहे (Balasaheb Thorat made the revenue department hi-tech and top in the country).

अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज येथे अमृतवेलच्या वतीने डिजिटल सातबारा या पुस्तकाचे प्रकाशन बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, अमृतवेल मिडियाचे संपादक धर्मेंद्र पवार, राज्य समन्वयक व उपजिल्हाधिकारी रामदास जगताप, प्रांताधिकारी शंशिकात मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम, आदिंसह पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

लोकल प्रवासासाठी आता अधिकारप‌‌त्र बंधनकारक

शरद पवारांना सर्व फुकट पाहिजे; निलेश राणे

याप्रसंगी बाळासाहेब थोरात म्हणाले की, सुवर्ण जयंती राजस्व अभियान अंतर्गत महसूल विभागातील विविध कामे ऑनलाईन पद्धतीने केली गेली. यामुळे सातबारा सह सर्व उतारे शेतकऱ्यांना मिळवणे सोपे झाले. आतापर्यंत दोन कोटी 53 लाख सातबारे हे ऑनलाईन झाले. असून आगामी काळात सर्वच उतारे ऑनलाईन करण्यासह चतुर्सिमा फेरफार ही ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहे (Chatursima Ferfar will be available online with all excerpts online in the near future).

Balasaheb Thorat department hi-tech and top in the country
बाळासाहेब थोरात

महाराष्ट्राचे महसूल विभागाचे डिजिटल कामकाज हे राष्ट्रीय पातळीवर गौरवास्पद ठरले असून बाहेरील विविध राज्यांमधून अनेक महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी राज्याची काम करण्याची पद्धती अभ्यास करण्यासाठी येत आहेत. या विभागात अत्यंत चांगले काम करताना अद्यावत प्रणाली, हायटेक तंत्रज्ञानाचा वापर त्वरित दाखल्यांची उपलब्धता व पारदर्शकता यातून सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी आपला सातत्याने प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. त्याचबरोबर या नव्या डिजिटल सातबारा अंकाच्यामुळे एक नवी प्रणाली रूढ होत असून महसूल विभागाच्या या कामात सर्व वरिष्ठ अधिकारी ते तलाठी कोतवाल कर्मचारी या सर्वांचा मोठा सहभाग असल्याचे ते म्हणाले.

ठाकरे सरकार तुमची घर वसुली वर चालतात पण… मनसेचा आक्रोश

Read more at: http://timesofindia.indiatimes.com/articleshow/83917484.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst

तर आमदार डॉ. तांबे म्हणाले की, बाळासाहेब थोरात यांनी महसूल विभागाला हायटेक करण्याबरोबर देशात अव्वल बनवले आहे. देशातील सर्व राज्यांमधील चांगला महसूल विभाग कोणता तर महाराष्ट्राचा असा गौरवाने उल्लेख होत असून हे संगमनेर तालुक्यासाठी सदैव अभिमानास्पद ठरत आहे (Maharashtra is proudly mentioned as one of the best revenue departments in all the states of the country and it has always been a source of pride for Sangamner taluka).

तर राज्य समन्वयक रामदास जगताप म्हणाले की, महसूल विभागाने आपले कामकाज संगणकीकृत केले त्यानंतर ऑनलाईन केले व आता डिजिटल होत आहे. मागील पन्नास वर्षांमधील हे सर्वात ऐतिहासिक काम असून सातबारा, ई पीक पाहणी, ई-फेरफार सर्वच कामे डिजिटल करण्यात येत आहे. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या कामामध्ये सुसूत्रता तत्परता, पारदर्शकता व अचूकता आली आहे (Under the guidance of Balasaheb Thorat, the work of the revenue department has been coordinated with promptness, transparency and accuracy).

या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक धर्मेंद्र पवार यांनी केले सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर तहसीलदार अमोल निकम यांनी आभार मानले

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी