28.5 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
HomeमुंबईAuto and Taxi Strike from 26th September: सामान्य मुंबईकरांच्या खिश्याला कात्री...

Auto and Taxi Strike from 26th September: सामान्य मुंबईकरांच्या खिश्याला कात्री लागण्याची शक्यता

नवरात्रीचा सण सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 26 सप्टेंबरपासून भाडेवाढ करण्यासंदर्भात ऑटो-रिक्शा व टॅक्सी चालक संघटनांनी (Auto-Rickshaw and Taxi Strike) अनिश्चितकालीन संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.

मुंबईसारख्या (Mumbai) प्रचंड व्यस्त व गजबजलेल्या शहरामध्ये लोकल ट्रेन आणि बेस्टच्या बसेस सहित ऑटो-रिक्शा व टॅक्सी ही अंत्यत महत्त्वाची वाहतूकीची साधने आहेत. त्यामुळे एक दिवस जरी यांच्या सेवा बंद पडल्या तर सामान्य चाकरमान्यांवर त्याचा खूप परिणाम दिसून येतो. मुंबईतील ऑटो-रिक्शा व टॅक्सी चालक हे सध्याच्या राज्य सरकारवर खूप नाराज आहेत. प्रवासी भाडेवाढ करण्यासंदर्भात त्यांनी ऑगस्ट महिन्यापासून दोन वेळा सरकारला संपावर जाण्याचा इशारा दिला होता. परंतु दोन्ही वेळा सरकारने गुळमुळीत आश्वासने देऊन त्यांच्या संप टाळला होता. आता मात्र ऑटो-रिक्शा व टॅक्सी चालक संघटना (Auto-Rickshaw and Taxi Union) काहीही ऐकण्याच्या मनःस्थिती नाही आहेत. नवरात्रीचा सण सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 26 सप्टेंबरपासून भाडेवाढ करण्यासंदर्भात ऑटो-रिक्शा व टॅक्सी चालक संघटनांनी (Auto-Rickshaw and Taxi Strike) अनिश्चितकालीन संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.

यावर भाष्य करताना मुंबई टॅक्सीचालक संघटनेचे सरचिटणीस ए.ल.क्वाड्रोस बोलले की, आम्ही राज्य सरकारकडे प्रवासी भाडे वाढवण्याची मागणी 1 ऑगस्ट पासून करत आहोत. राज्य शासनाकडून मिळालेल्या आश्वासनानंतर मुंबईतील सामान्य लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून दोनवेळा आमचा संप मागे घेण्याचा निर्णय घेतला. परंतु हया वेळेस आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत. जोपर्यंत सरकारकडून आम्हाला अधिकृतरीत्या या संपूर्ण मुदद्यावर आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही.

हे सुद्धा वाचा –

National Education Policy 2020: नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारत शिक्षणाचे जागतिक केंद्र बनेल – जे. पी. नडडा

Rahul Gandhi : राहूल गांधीनी दिला आपल्याच पक्षातील मोठया नेत्यांना सल्ला

Ulhasnagar News : ‘या’ ठिकाणी जाताहेत नागरिकांचे नाहक बळी

ऑटो-रिक्शा व टॅक्सी चालक संघटनानी 15 सप्टेंबर रोजी दुसऱ्यांदा संप करण्याचा इशारा दिला होता. तेव्हा राज्याचे उदयोग मंत्री उदय सामंत यांनी ऑटो-रिक्शा व टॅक्सी चालक संघटनांना आश्वासन दिले होते की नवीन भाडेवाढ 23 सप्टेंबरपासून लागू करण्यात येईल. त्याआधी ऑटो-रिक्शा व टॅक्सी चालक संघटनानी 1 ऑगस्टला संपण्याचा इशारा दिला परंतु तेव्हा सुद्धा राज्य सरकारने ‍दिलेल्या आश्वसनानंतर तो संप मागे घेण्यात आला होता.

प्रवासी भाडयामध्ये वाढ व इंधनावर 40 टक्के अनुदान मिळावे अश्या ऑटो-रिक्शा व टॅक्सी चालक संघटनांच्या दोन मुख्य मागण्या सरकारदरबारी प्रलंबित आहेत.

सध्या टॅक्सीचे किमान भाडे 25 रूपये आहे ते 30 रूपये करावे याबाबत टॅक्सी संघटनांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहीले होते. त्याचप्रकारे, ऑटो-रिक्शाचे किमान भाडे 21 रूपये आहे ते 23 रूपये करावे अशी ऑटो-रिक्शा संघटनाची मागणी आहे.

जर ऑटो-रिक्शा व टॅक्सी चालक संघटनाच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर 26 सप्टेंबरपासून लोकल ट्रेन व बेस्ट बसेसवर त्याचा ताण पडण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

अश्विन शेश्वरे
अश्विन शेश्वरेhttp://laybhari.in
He writes about National and Maharashtra Politics, Education, Health, Civic, Legal, Crime and Sports beat for LayBhari News.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी