30 C
Mumbai
Monday, May 13, 2024
Homeमुंबईअविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात; दहीहंडी साजरा करण्यावर मनसैनिक ठाम

अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात; दहीहंडी साजरा करण्यावर मनसैनिक ठाम

टीम लय भारी

ठाणे : राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षीप्रमाणे या वर्षीही गोपाळकाल्याच्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा करण्यावर बंदी घातली. दहीहंडी साजरी करण्याच्या मुद्द्यावर मनसे अधिक आक्रमक झाली आहे. दहीहंडी साजरी करता यावी म्हणून मनसेचे ठाणे-पालघर अध्यक्ष अविनाश जाधव यांनी आज सकाळ पासून आमरण उपोषण सुरू केले. परंतु, पोलिसांनी जाधव यांच्यासह मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून त्यांना नौपाडा पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे (Avinash Jadhav in police custody).

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यंदा दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी करण्याची भूमिका घेत ठाण्यामधील भगवती मैदानामध्ये आज सकाळपासून आंदोलन सुरु केले. मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव आंदोलन करत असतानाच ठाणे पोलिसांनी अविनाश जाधव आणि ठाणे शहरातील मनसे पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. अविनाश जाधव यांना ताब्यात घेण्यात आले तेव्हा मनसैनिकांनी उद्धव ठाकरे हाय हाय अशी घोषणाबाजी करण्यात आली.

मुख्यमंत्र्यांना धनुष्यबाणाचा विसर, मनसेने करून दिली आठवण

मनसेचा उद्धव ठाकरेंवर पुन्हा निशाणा, पण टास्क फोर्सच्या खांद्यावर बंदूक ठेवून

आम्हाला दहीहंडी उत्सव नियमांचे पालन करुन साजरा करु द्यावा अशी मनसेचे मागणी आहे. यासाठी आज सकाळपासूनच भगवती मैदानावर मनसेने तयारी सुरु केली. या मैदानामध्ये स्टेज उभारण्यात येत होता. मात्र सकाळपासूनच पोलिसांनी या ठिकाणी पोलीसबंदोबस्त तैनात केला. सव्वा अकराच्या सुमारास येथे पोलिसांच्या मोबाईल व्हॅन्स दाखल झाल्या आणि त्यानंतर जाधव यांच्यासहीत पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी राज ठाकरेंचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या तसेच उद्धव ठाकरेंविरोधातही घोषणाबाजी झाली (There were also slogans against Uddhav Thackeray).

अविनाश जाधव यांना जरी ताब्यात घेतले असल तरी मनसेकडून ठाण्यात दहीहंडी साजरी करणारच, असे मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले. एकतर दहीहंडी होईल किंवा मनसैनिक जेलमध्ये जातील. कोणाकोणाला जेलमध्ये टाकताय त्यांना टाका असे आव्हान मनसेकडून देण्यात आले.

Avinash Jadhav in police custody
अविनाश जाधव यांच्यासहीत पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले

मनसेने मानले मुख्यमंत्र्यांचे आभार!

thane: Toll booth damaged by MNS workers

दहीहंडी उत्सवावर जरी सरकारने निर्बंध घातले असले तरी मनसेकडून आयोजित करण्यात आलेला दहीहंडी उत्सव आम्ही साजरा करणारच अशी भूमिका मनसेने घेतली आहे. मनसेने अगदी मोजक्याच ठिकाणी योग्य ती काळजी घेऊन हे आयोजन केलेले होत. परंतु मुख्यमंत्री फक्त हिंदू सणांवर निर्बंध घालतात. त्यापेक्षा उपाययोजना केल्या असत्या तर बरं झाले असत अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली आहे. नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा असो किंवा शिवसेनेने केलेली आंदोलन असो त्यावेळी कोरोना कुठे गेला होता? शिवसैनिकांना कोरोना होत नाही का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला (Dont Shiv Sainiks get corona? He also raised such a question).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी