27 C
Mumbai
Monday, July 8, 2024
Homeमुंबईउद्धव ठाकरेंच्या रडारवर आता बडे आयएएस अधिकारी

उद्धव ठाकरेंच्या रडारवर आता बडे आयएएस अधिकारी

टीम लय भारी

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चार टप्प्यांत जवळपास ५४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. आता आणखी काही बदल्या लवकरच होऊ घातल्या आहेत. त्यात बड्या आयएएस अधिकाऱ्यांचा समावेश असेल असे बोलले जात आहे.

ठाकरे यांनी आतापर्यंत केलेल्या बदल्यांमध्ये मंत्रालय स्तरावरील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या फार बदल्या केलेल्या नाहीत. ठाकरे यांनी भूषण गगराणी व विकास खारगे यांना आपल्या कार्यालयाचे प्रधान सचिव म्हणून नियुक्त केले आहे. परंतु मंत्रालयातील विविध खात्यांच्या प्रधान सचिवांच्या बदल्यांना त्यांनी अद्याप हात घातलेला नाही. त्यामुळे चौथ्या टप्प्यातील बदल्याही लवकरच होतील. त्यात मंत्रालय स्तरावरील मोठ्या अधिकाऱ्यांचा समावेश असेल. अनेक अधिकारी पाच – सहा वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत आहेत. तर काहीजणांनी गेल्या पाच वर्षांत प्रशासनात राहून ‘संघ’निष्ठा जपली आहे. अशा दोन्ही प्रकारच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या येत्या काही दिवसांत होतील असे बोलले जात आहे.

आतापर्यंत केलेल्या बदल्यांमध्ये तुकाराम मुंढे, आश्विनी भिडे, आश्विनी जोशी व प्राजक्ता लवंगारे, विकास खारगे, भूषण गगराणी यांच्या बदल्या विशेष चर्चेत राहिल्या आहेत. मुंढे, खारगे व गगराणी यांच्यावर ठाकरे यांचा वरदहस्त राहिल्याचे दिसून येत आहे. तर भिडे, जोशी व लवंगारे यांची उचलबांगडी केल्याचे दिसत आहे. या तिन्ही महिला अधिकाऱ्यांना महत्वाच्या पदांवरून हटविले आहे, आणि दुय्यम दर्जाच्या पदांवर पाठविण्यात आले आहे. विशेषतः विधानसभा निवडणुकीपूर्वी आरे येथील मेट्रो कारशेडवरून शिवसेना व आश्विनी भिडे यांच्यात चांगलीच जुंपली होती. जोशी मुंबई महापालिकेत असताना त्यांच्या कार्यपद्धतीवर सत्ताधारी शिवसेनेत नाराजी होती. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांच्या मर्जीतील आणखी काही अधिकाऱ्यांच्या येत्या काही दिवसांत बदल्या होतील असे सूत्रांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यावर तुकाराम मुंढे, एकूण २० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुख्यमंत्र्यानी केल्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुख्यमंत्र्यांच्या रडारवर ६० आयएएस अधिकारी

आदित्य ठाकरे जे बोलले, ते त्यांनी करून दाखवले

आदित्य ठाकरेंच्या अभ्यासू मार्गदर्शनावर आयएएस अधिकारीही झाले चकीत

VIDEO : अधिकाऱ्यांच्या बदल्या सूडभावनेने नकोत : भाजपने ठणकावले

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी