30 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeमुंबईराहुल गांधी यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा; वाचा काय आहे प्रकरण

राहुल गांधी यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा; वाचा काय आहे प्रकरण

काँग्रेसचे (Congress) नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी राफेल विमान (Rafale fighter jet) खरेदी व्यवहारावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर वादग्रस्त टीका केली होती. याबाबत राहुल गांधींविरोधात मुंबईत 2019 साला मध्ये मानहानीचा खटला दाखल झाला आहे. या दाव्यावर फौजदारी कारवाई सुरू करण्याचे आदेश गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने दिले असून, राहुल गांधींना कोर्टापुढे हजर राहण्याचे निर्देश दिले गेले होते. याप्रकरणी दाखल झालेली तक्रार रद्द करण्यासाठी राहुल गांधी यांच्यावतीनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे, त्यावर सुनावणी होईल. तूर्तास मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court) दंडाधिकारी कोर्टाच्या सुनावणीस स्थगिती दिलेली आहे. यामुळे हा राहुल गांधी यांना हायकोर्टाचा दिलासा असल्याचे मानले जाते आहे. (Bombay High Court gives relief to Rahul Gandhi)

मानहानी प्रकरणात दिलासा मागत दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी 16 मार्चपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. गिरगाव दंडाधिकारी कोर्टातील खटल्यात तोपर्यंत सुनावणी न घेण्याचे निर्देश हायकोर्टाने दिलेत. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबत गंभीर विधान केल होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख “चौकीदार चोर है” असा त्यांनी केला होता. याच बाबत राहुल गांधींविरोधात मानहानीची तक्रार दाखल आहे.

हे सुद्धा वाचा

ईडीचा गुन्हा रद्द करावा यासाठी छगन भुजबळ यांची याचिका

दादरचे शिवसेना भवन ठाण्यात स्थलांतरित

पोलिसांची ‘सामना’ कार्यालयात घुसून दमदाटी

दरम्यान आज हायकोर्टाने दंडाधिकारी कोर्टाच्या सुनावणीस स्थगिती दिल्याने राहूल गांधी यांना दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे. या प्रकरणी आता 16 मार्च नंतर सुनावणी होणार आहे. त्यामुळे येत्या 16 मार्चपर्यंत गिरगाव दंडाधिकारी न्यायालयाला या प्रकरणावर सुनावणी घेता येणार नाही. राफेल विमान खरेदी प्रकरणावर काँग्रेसने सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्लाबोल करत खरेदीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी