32 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeराजकीयपोलिसांची 'सामना' कार्यालयात घुसून दमदाटी

पोलिसांची ‘सामना’ कार्यालयात घुसून दमदाटी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील कुख्यात गुंड राजा ठाकूर याला आपल्याला जीवे मारण्यासाठी सुपारी दिल्याचा धक्कादायक आरोप शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्याबाबत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे माहिती दिली होती. मात्र, माझ्या अनुपस्थितीत पोलिसांनी ‘सामना’च्या कार्यालयात घुसून दमदाटी केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. (Mumbai Police misbehaved in Samana office)

या प्रकरणी आपण पोलीस आयुक्तांना पात्र लिहिणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. याबाबत तुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार का? असा प्रश्न संजय राऊत यांना विचारला असता त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर खोचक टीका केली आहे. ते म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांना मी भेटणार नाही. कारण ते चाळीस खोक्यांखाली चिरडून काम करत आहेत. चाळीस खोके त्यांच्या अंगावर पडले आहेत. त्या खोक्यांच्या दबावातच ते काम करत असून त्यांची अवस्था दयनीय आहे”.

ते म्हणाले, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ४० खोक्यांखाली चिरडून काम करत आहेत. चाळीस खोके त्यांच्या अंगावर पडले आहेत. त्यामुळे मला आलेल्या धमकी प्रकरणी आणि सामना कार्यालयात पोलिसांनी केलेल्या दमदाटीबद्दल मी त्यांना भेटणार नाही. (will not meet to Devendra Fadanvis) राऊत यांनी यावेळी पोलिसांच्या मनमानीबद्दल नाराजी व्यक्त केली असून याबाबत पोलीस आयुक्तांना पात्र लिहिणार असल्याचे त्यांनी सांगितले. मी नाशिकला असताना धमकीप्रकरणी माझे पोलिसांशी बोलणं झालं होतं. त्यावेळी मी त्यांना नाशिकला आल्याचे सांगितले होते. तुम्ही आत्ता येऊ नका मी नाशिकला आहे, असे मी पोलिसांना सांगितले होते. तरीदेखील पोलिसांनी ‘सामना’च्या कार्यालयात येऊन दमदाटी केली. पोलिसांकडे आधीच छापील कागद होते. त्यावर त्यांनी बळजबरीने सह्या घेतल्या. हा सगळा प्रकार पोलीस आयुक्तांना कळवणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

अंधेरी रेल्वे स्थानकाबाहेर सीएनजी बस जळून खाक : प्रवासी सुखरूप

शिवसेना मुख्यनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड; शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणीत निर्णय

किशोरी पेडणेकर यांना एसआरए घोटाळा प्रकरणात दिलासा; उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले ‘हे’ आदेश

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी