28 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमुंबईबिहारप्रमाणे महाराष्ट्रातही होणार जातीनिहाय जनगणना..?

बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही होणार जातीनिहाय जनगणना..?

विधान परिषदेतील आमदार कपिल पाटील यांनी बिहार राज्याप्रमाणे महाराष्ट्र मध्ये ही जातीनिहाय जनगणना व्हावी अशी मागणी केली होती. त्यावर सरकारतर्फे अनुकूलता दर्शविली गेल्याने महाराष्ट्र देखील जातीनिहाय जनगणना होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Caste-wise population in Maharashtra)

बिहार राज्यात जातीनिहाय जनगणना केली जात आहे. त्याच्यावर काम देखील सुरू आहे. त्याला चांगला प्रतिदास मिळत आहे. याच मुद्यावर कपिल पाटील यांनी विधान परिषद मध्ये प्रश्न उपस्थित केला होता. हा प्रश्न तीन दिवसांनंतर पुन्हा चर्चेला आला. बिहार राज्याप्रमाणे महाराष्ट्रात ही जाती निहाय जनगणना करावी, अशी मागणी आपण केली होती. त्यावर आता सरकारने अनुकूलता दाखवली आहे.

या प्रश्नांला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले की, तिथे कसा प्रतिसाद मिळतोय हे आपण पाहू. त्याच्या योजनेचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांच एक पथक पाठवू. हे पथक तिथे जाऊन त्यांच्या योजनेचा अभ्यास करेल आणि त्याचा अहवाल सरकार ला सादर करेल.त्यानंतर राज्य सरकार इथे जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेईल, अस उत्तर दिल्याचं कपिल पाटील यांनी सांगित हलं.

बिहार राज्यात राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांच्या राज्यातील सर्वच जातींचा जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे.यावेळी सगळ्याच जातीची आर्थिक , सामाजिक आणि शैक्षणिक पाहणी करण्याचं ठरवलं आहे.यातून दोन गोष्टी होणार आहेत. एक म्हणजे आरक्षण आणि दुसरा म्हणजे त्यात्या जातीला आर्थिक नियोजनात हिस्सा देण्याचा भाग, असे देखील कपिल पाटील यांनी सांगितलं.

बिहारप्रमाणे महाराष्ट्र मध्ये ही जातीनिहाय जनगणना झाल्यास इथे ही आरक्षणचा मुद्दा स्पष्ट होईल त्याचप्रमाणे प्रत्येक जातीला त्यांच्या संखे प्रमाणे आर्थिक हिस्सा मिळेल, अस ही कपिल पाटील म्हणाले.

हे सुद्धा वाचा :

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या भव्य वास्तूचे सोमवारी राज्यपालांच्या हस्ते भूमिपूजन

राज्याने केंद्र सरकारकडे मागितले 1600 कोटी

…असे होत राहिले तर हळूहळू महाराष्ट्र खिळखिळा होईल: आमदार भास्कर जाधव

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी